गुरुग्राममध्ये वडिलांनी केली मुलीची हत्या (फोटो- istockphoto)
गुरुग्राम: गुरुग्राममधून एक मोठी बातमी समोर येत आहे. टेनिस खेळाडू राधिका यादवची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. या घटनेत एक महत्वाची माहिती समोर आली आहे. राधिका यादवची हत्या तिच्या वडिलांनीच केली आहे. टेनिस खेळाडू असलेली राधिका यादव ही गुरुग्रामच्या सुशांत लोक परिसरात वास्तव्यास होती. दरम्यान या प्रकरणात आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. तसेच या घटनेचा तपास सुरु केला आहे.
मात्र राधिकाच्या वडिलांनी राधिकाला गोळ्या घालून का मारले यामागचे कारण समोर येऊ शकलेले नाही. राधिका यादव आणि तिचे वडील एकाच घरात राहत होते. गुरुग्राम येथील राहत्या घरात वडिलांनी राधिकाला गोळी मारल्यावर तिला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. दरम्यान या घटनेचा तपास करत आहेत. गुरुग्रामच्या सुशांत लोक येथील ही घटना त्यांच्या निवासस्थानी घडली. त्यांनतर पोलिसांनी वडिलांना अटक करून बंदूक जप्त केली आहे.
कपिल शर्माच्या कॅफेवर तुफान गोळीबार
कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. हा प्रकार कॅनडामध्ये घडला आहे. कपिल शर्माने काही दिवसांपूर्वीच कॅनडामध्ये एक नवीन कॅफे सुरु केला होता. त्याच कॅफेवर आता काही अज्ञात लोकांनी गोळीबार केला आहे. प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा आणि त्याची पत्नी गिन्नी चथरथ सोबत मिळून एकत्रितपणे कॅनडामध्ये एक नवीन व्यवसाय सुरु केला आहे. दोघांनी मिळून कॅनडामध्ये एक कॅफे सुरु केला आहे. काही दिवस आधीच त्याचे उदघाटन करण्यात आले होते. मात्र आज अचानक काही अज्ञात लोकांनी येऊन गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
गोळीबार करतानाचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कपिल शर्माचा हा कॅफे कॅनडाच्या सरे या भागात आहे. तीन ते चार दिवस आधीचे कपिलने हा कॅफे सुरु केला होता. दरम्यान खलिस्तानी दहशतवादी संघटना बब्बर खालसा आंतरराष्ट्रीय गॅंगने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या हल्ल्यात हरजीत सिंग लडीचे नाव समोर येत आहे. तो एक कुख्यात दहशतवादी आहे.
कुख्यात दहशतवादी हार्जित सिंग लडीने कपिल @SurreyPolice च्या वक्तव्यांचा हवाला देत ही गोळीबाराची घटना घडली असल्याचे त्याने म्हटले आहे. कपिल शर्मा हे भारतीय फिल्म इंडस्ट्रीमधील एक मोठे नाव आहे. त्याच्या कॅफेवर कॅनडामध्ये गोळीबार झाल्याने चित्रपट सृष्टीत एकच खळबळ उडाली आहे. कॅनडा पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.