भारताच्या या जंगलात सापडला मोगली
Travel News : हे आहे भारतातील सर्वात भयानक बीच, इथे असतो आत्म्याचा खुला वावर…
सेओनीच्या जंगलातून मिळाली कथा
रुडयार्ड किपलिंग याच्या पुस्तकांमध्ये चित्रित केलेली जंगले, पर्वत आणि नद्या ही केवळ काल्पनिक ठिकाणे नाहीत. खरंतर ती मध्य प्रदेशातील सेओनी जिल्ह्याच्या जंगलांपासून प्रेरित होती. आज सेओनीचा हा परिसर पेंच व्याघ्र प्रकल्प म्हणून ओळखला जातो. या पुस्तकात वैनगंगा नदीचाही उल्लेख करण्यात आला आहे जिथे मोगली आणि जंगलातील अन्य प्राणी पाणी प्यायला जातात. हे कोणतेही काल्पनिक नाव नसून सत्यात सिओलीमध्ये ही नदी वाहते. अशाप्रकारेच कथेत अनेक अशा गोष्टींची नावे वापरण्यात आली आहेत जी सत्यात अस्तिवात आहेत.
खऱ्या मोगलीची कथा
किपलिंगच्या कथेत ज्या मोगलीचा उल्लेख करण्यात आला आहे तो अनेकांना काल्पनिक वाटतो. आपल्याला वाटतं की, एखादा मुलगा जंगलात अस्वल, कोल्ह्यासोबत कसा राहत असेल पण तुम्हाला माहिती आहे का? ही कथा खऱ्या घटनेवरुन प्रेरीत आहे. खरंतर, १८३१ मध्ये सिओनी जिल्ह्यातील एका गावाजवळ एका लहान मुलाला लांडग्यांच्या गुहेतून रेस्क्यू करण्यात आलं होतं. त्या मुलाला मानवांप्रमाणे बोलायलाही किंवा चालायला जमत नव्हतं.
दिल्ली-मुंबई नाही… भारताच्या या शहरात आहे आनंददायी वातावरण; ग्लोबल रिपोर्ट आला समोर
या घटनेची नोंद ब्रिटीश अधिकारी सर विलियम हेनरी स्लीमॅनने आपल्या रिपोर्ट आणि पुस्तकात केली. याशिवाय, रॉबर्ट आर्मिटेज स्ट्रेनडेलच्या पुस्तकांनीही किपलिंगला सेओनीच्या जंगलाविषयी चांगल्या प्रकारे जाणून घेण्यास मदत केली. रुडयार्ड किपलिंगने सेओनीचा परिसर जवळून अनुभवला आणि प्राण्यांमध्ये वाढलेल्या मुलाविषयी ऐकून ते प्रेरित झाले आणि त्यांना ‘द जंगल बुक’ लिहिण्याची प्रेरणा मिळाली. त्यांची ही कथा पुढे जाऊन मुलांमध्ये फार प्रसिद्ध झाली आणि नंतर अनेक कार्टून आणि चित्रपटांमध्ये याचा वापर करण्यात आला.






