विम्याचे दोन कोटी हडपण्यासाठी जीवंत असतानाच केला तेरावा; लेकाला मिळाली बापाची साथ (फोटो : संग्रहित फोटो)
इचलकरंजी : बोगस सोने विक्रीचे खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देत दत्तवाड (ता. शिरोळ) येथील सराफाकडे 5 लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी इचलकरंजीचे भाजप माजी नगरसेवक मनोज साळुंखे, बाजीराव कुंभार आणि शहानवाज मुजावर या तिघांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी पंकज सुभाष दानवाडे (वय २९ रा. नदीवेस रोड दत्तवाड) याने फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, १४ ते १८ मार्च २०२५ या कालावधीत डायना स्टार सीएनसी मशिन वर्कशॉपजवळ असलेल्या एका ऑफिसवजा रुममध्ये फिर्यादी पंकज दानवाडे याला बोलावून घेण्यात आले. त्याठिकाणी शहानवाज मुजावर याने दानवाडे याला आत्ताच्या आता आम्हाला पाच लाख रुपये दे, अन्यथा येथून सोडणार नाही, असे म्हणत शिवीगाळ व मारहाण केली. त्यावेळी भीतीपोटी दानवाडे याने जवळील 50 हजार रुपये दिले. त्यावर मनोज साळुंखे यांनी ‘राहिलेली रक्कम आता आणून दे, नाहीतर तुला उघडा करुन तुझा व्हिडीओ व्हायरल करतो. पोलिसात जावू नकोस, माझ्यावर भरपूर गुन्हे दाखल आहेत’.
‘तुझ्याकडे भरपूर पैसा आहे, त्यातील पाच लाख रुपये मला दे. नाहीतर बोगस सोने विक्री करतो म्हणून माझ्या माणसांना सांगून तुझ्यावर खोटे गुन्हे दाखल करतो. तुझ्या कुटुंबालाही ठार मारेन’, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी मनोज साळुंखे, बाजीराव कुंभार व शहानवाज मुजावर या तिघांना अटक करण्यात आली असल्याची माहिती शिवाजीनगरचे पोलिस निरिक्षक सचिन पाटील यांनी दि






