वैद्यकीय प्रवेशाच्या नावावर 3 लाखांनी फसवणूक (File Photo : Fraud)
अमरावती : तामिळनाडूच्या एका व्यापाऱ्याने शहरातील संत्रा व्यावसायिकाची 23 लाख 14 हजारांनी फसवणूक केली. ही घटना मंगळवारी (दि. 25) समोर आली आहे. अमरावती येथील एका व्यावसायिकाने तामिळनाडूतील एका व्यावसायिकाला संत्री पाठवली होती. दरवर्षी त्यांचा हिशोब मार्च महिन्यात पूर्ण होत असतो. मात्र, तामिळनाडूतील व्यावसायिकाने अमरावती येथील व्यावसायिकाला मागील तीन वर्षांपासून हिशोबाचे पैसे दिले नाहीत.
हेदेखील वाचा : BMC Garbage Tax : मुंबईत कचरा कराल तर खबरदार! आता कचरा उचलण्यासाठी मोजावे लागणार पैसे
अमरावतीच्या या व्यावसायिकाचे तब्बल 23 लाख 14 हजार रुपये दिले नाहीत. त्यामुळे संत्रा व्यापारी काझी अझरुद्दीन काजी अन्सारी उद्दीन (वय 33, बाग बिल्डिंग जमिल कॉलनी, अमरावती) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तामिळनाडू येथील मुरुगन वेल्लूविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. काझी अजरुद्दीन यांचा वडिलोपार्जित फळे विकण्याचा व्यवसाय आहे. ते शेतकरी आणि व्यापाऱ्यांकडून घाऊक दराने माल खरेदी करतात आणि इतर व्यापाऱ्यांना विकतात. त्यांचे कंवरनगरमध्ये एफसी फ्रुट कंपनी नावाचे कार्यालय आहे. त्यांचा फळांचा माल महाराष्ट्रासह इतर राज्यात पाठवला जातो. वार्षिक व्यवहार पूर्ण झाल्यानंतर व्यापारी मालाचे पैसे देतात.
दरम्यान, 2019 ते 2021 या वर्षात काझी अझरुद्दीनने तामिळनाडूच्या मुरुगन वेल्लूला आपला माल पाठवला होता. मात्र, मार्च महिना उलटूनही संबंधितांनी मालाचे पैसे पाठवले नाहीत. आरोपींसोबत संपर्क साधला असता ते उडवाउडवीची उत्तरे देत होते. काझी अजरुद्दीन यांना आरोपींकडून हिशोबाचे 23 लाख 14 हजार 782 रुपये येणे होते. ज्याची तक्रार राजापेठ पोलिस ठाण्यात करण्यात आली.
चौकशीसाठीही आरोपी उपस्थित नाही
विशेष म्हणजे आरोपी चौकशीसाठीही उपस्थित नव्हते. त्यामुळे सोमवारी (दि. 24) काझी अझरुद्दीन यांच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी मुरुगन वेल्लूविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
दुप्पट पैशांच्या आमिषाने फसवणूक
साताऱ्यात फसवणुकीची घटना समोर आली आहे. ‘आमच्याकडे स्कीममध्ये पैसे गुंतवल्यास रकमेच्या दुप्पट पैसे अथवा दुप्पट रकमेचे सोने मिळेल’, असे आमिष दाखवून 9 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. धन्यकुमार गोरख माने, शरयू धन्यकुमार माने (रा. राजगुरुनगर, सध्या रा. संगमनगर खेड) व प्रतिक्षा सिद्धार्थ गडांकुश (रा. चिंचणेर, ता. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
हेदेखील वाचा : Vijay Wadettiwar: ‘त्या’ वक्तव्याप्रकरणी वडेट्टीवारांच्या अडचणी वाढणार? मंगलप्रभात लोढांनी तक्रार करत केली मोठी मागणी