मंत्री मंगलप्रभात लोढा (फोटो- सोशल मिडिया/ट्विटर)
मुंबई: जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज यांच्याविषयी अपशब्द वापरल्याने काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. नरेंद्राचार्य महाराज यांच्या अनुयायांच्या भावना दुखावल्याने, आज मुंबई उपनगर जिल्ह्याचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत अनुयायांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करून तक्रार दिली. पुढे यासंदर्भात पोलिसातही तक्रार दाखल केली जाणार असल्याचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले. तसेच, विजय वडेट्टीवार यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी अनुयायांनी केली आहे.
जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्याविषयी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी अपशब्द वापरल्याबद्दल या विरोधात नरेंद्राचार्य महाराज यांच्या अनुयायांसोबत जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करून अधिकृत तक्रार दाखल केली. प्रसंगी उपस्थित पत्रकारांसोबत संवाद साधला.@nanijdham pic.twitter.com/ruYVFYKXZq
— Mangal Prabhat Lodha (@MPLodha) February 24, 2025
यावेळी मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले, “विजय वडेट्टीवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांना हिंदू धर्म, श्रद्धा आणि गुरुंबद्दल अपमानास्पद भाषा वापरण्याची जुनी सवय आहे. परंतु यावेळी केलेले विधान अक्षम्य असून, संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. मी विजय वडेट्टीवार यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो होऊ शकला नाही. आता मी त्यांना प्रत्यक्ष भेटून माफी मागण्यास सांगणार आहे. नरेंद्राचार्य महाराजांनी हिंदू धर्मासाठी आणि समाजासाठी मोठे कार्य केले आहे. स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून देशात आणि परदेशात केलेल्या लोकसेवेबद्दल कदाचित विजय वडेट्टीवार यांना माहिती नसेल!”
नरेंद्र महाराजांबद्दल एकेरी उल्लेख केल्याप्रकरणी निषेधार्थ मोर्चा
नरेंद्र महाराजांबद्दल एकेरी शब्दात काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी काढलेल्या वक्तव्याच्या निषेध सिंधुदुर्गमध्ये करण्यात आला आहे. जिल्ह्यातील नरेंद्र महाराज भक्त सेवा मंडळ सिंधुदुर्ग सेवा समितीच्या वतीने निषेध मोर्चा का प्रशासनाचे लक्ष वेधले. याबाबत त्यांनी माफी न मागितल्यास आम्ही तीव्र आंदोलन छेडू असा इशारा ही दिला आहे.जगद्गुरु नरेंद्रजी महाराज भक्तसेवा मंडळ जिल्हा सेवा समितीच्या वतीने पिठ प्रमुख सुदीन तेंडुलकर जिल्हाध्यक्ष दिनेश मुंबरकर मुख्यपीठ सहाय्यक दीपक खरडेजनम प्रवचनकार प्रिया परब विलास परब सिद्धी बोंद्रे रमिला बागकर तनवी मोर्ये रेश्मा नाईक गौरी खोचरे पद्मानंद करंगुटकर अभिषेक राऊत आदींसह जिल्हातील नरेंद्र महाराज यांचे भक्त मोठ्या संख्येने मोर्चा सहभागी झाले होते.
हेही वाचा: Sindhudurg News: नरेंद्र महाराजांबद्दल एकेरी उल्लेख केल्याप्रकरणी निषेधार्थ मोर्चा
राज्यात सध्या हिंदू जनजागरण चळवळ सुरू आहे हिंदूंच्या भावना दुखावणाऱ्या घटना काही प्रमाणात आतापर्यंत घडल्या काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या माध्यमातून जगद्गुरु नरेंद्र महाराज यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्यावर सिंधुदुर्ग तर अन्य जिल्ह्यातही त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. नरेंद्र महाराज सेवा समितीच्या वतीने आज सिंधुदुर्गात अचानक मूक मोर्चा काढणार असे जाहीर केले होते. परंतु त्याचे पडसाद उमटून निषेध मोर्चा काढला सिंधुदुर्गात आणि अन्य जिल्ह्यातही हे पडसाद उमटत आहेत जोपर्यंत कॉग्रेसनेले विजय वड्डेटीवारमाफी मागत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. असाच पवित्रा भक्तांनी घेतला आहे त्यामुळे यावर काय पडसाद म्हणतात काँग्रेसने ते विजय वडेट्टीवार काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.