अमरावतीतील एका घटनेने शहरात खळबळ निर्माण झाली आहे. पोटे आयुर्वेदिक महाविद्यालयात नर्स पदावर काम करत असलेल्या महिलेला मेट्रन पदावर बढती देतो म्हणून लैंगिक शोषण केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. प्राचार्याच्या या प्रतापाने महाविद्यालयाची पुरती बदनामी तर झालीच, मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी प्राचार्य डॉ. श्यामसुंदर भुतडा याचा शोध सुरू केला आहे .
कारागिरानेच लावला सराफा व्यावसायिकांना चुना; तब्बल 129 ग्रॅम सोने घेऊन झाला पसार
प्राचार्य एवढ्यावरच थांबला नाही तर…
प्राचार्य डॉ. श्यामसुंदर भुतडा याने पीडित नर्सवर लैंगिक शोषण केला. तिला प्रोमोशनच आमिष देत तिच्या वर लैंगिक शोषण केलं. प्राचार्य एवढ्यावरच थांबला नाही. त्याने “तुला प्रमोशन देतो तुझ्या तरुण मुलीला माझ्याकडे पाठव” अशी मागणी केली. मात्र पीडितेने त्याच्या या मागणीला नकार दिला.आणि नकार दिल्याचा राग मनात ठेवत प्राचार्याने थेट तिला नोकरीवरून काढून टाकल.
प्राचार्य फरार
पीडितेने या विरोधात पोलीस तक्रार दिली. पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राचार्य श्यामसुंदर भुतडा याच्या विरोधात पुरावे गोळा करण्यासाठी फॉरेंसिक तपासणी सुरू केली आहे. फॉरेन्सिक नमुने घेण्यासाठी टीम घरी गेली असता भूतडा पळून गेल्याची माहिती आहे. पोलिसांकडून आता भूतडाचा शोध घेतला जात आहे. मात्र या घटनेने अमरावती शहरात संतापाच वातावरण आहे. प्राचार्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. पोलीस त्याचा शोध घेत असून लवकरात लवकर त्याच्यावर कडक कारवाई करणार आहे..
पतीला झोपेच्या गोळ्या देऊन पत्नीने संपवलं,अनैतिक प्रेमसंबंधातून प्रियकराच्या मदतीने रचला कट
अमरावतीतून एक धक्कदायक बातमी समोर आली आहे. पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढल्याचे धक्कदायक घटना समोर आली आहे. त्याच्या चेहऱ्यावर राफ्टरने वार करून त्याला ठार मारण्यात आलं. ही घटना पथ्रोट येथील झेंडा चौक येथे मंगळवारी रात्री 10:45 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. मृतकाचे नाव अरविंद नजीर सुरत्ने असे आहे. याप्रकरणी पथ्रोट पोलिसांनी ३ सेप्टेंबरला पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास महिलेसह तिच्या प्रियकराविरुद्ध खून व ॲट्रासिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी प्रियकराला मंगळवारी अटक करण्यात आली. तर महिलेला बुधवारी अटक करण्यात आली. दोन्ही आरोपींनी खुनाची कबुली दिली आहे.
Pune Crime : जिथे गोळ्या घातल्या आणि कोयत्याने हल्ला केला, तिथेच घायवळ गँगची पोलिसांनी धिंड काढली