वैष्णवीच्या मृत्यूवर गौतमीची प्रतिक्रिया (फोटो- सोशल मीडिया)
पुणे: सासरच्या मानसिक आणि शारिरीक त्रासाला कंटाळून वैष्णवी हगवणे हिने आत्महत्या केली असून या प्रकरणाची राज्यभर जोरदार चर्चा सुरू आहे.वैष्णवी हगवणे प्रकरणाबाबत लावणी कलावंत गौतमी पाटील हिला याबाबत विचारल असता ती म्हणाली की जे काही झालं आहे ते खूपच दुर्दैवी असून मला आपल्या न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. जो आरोपी असेल त्याला कडक शिक्षा मिळाली पाहिजे आणि वैष्णवी हगवणे हिच्या सोबत असल्याचं यावेळी गौतमी पाटील म्हणाली.
लावणी कलावंत गौतमी पाटील हिचे दोस्ती दिलवाली हे गाणं रिलीज झालं असून कॉलेज लाईफ या गाण्यात दाखवलं असून गौतमी पाटील हिने यात मुख्य भूमिका साकारली आहे.
यावेळी गौतमी पाटील म्हणाली की लावणी व्यतिरिक्त काहीतरी वेगळं करण्याचं प्रयत्न केलं आहे.मी कधीही कॉलेज मधे गेले नाही पण या गाण्याच्या माध्यमातून कॉलेज लाईफ जगण्याचं प्रयत्न केलं आहे.खूपच चांगल्या पद्धतीने हसत खेळत हा गाण केलं असून लोकांनी ते पहावं अस यावेळी पाटील म्हणाली.
वैष्णवी हगवणे हिचे सासरे राजेंद्र हगवणे यांनी गौतमी पाटील हिला बैलांसमोर नाचवलं होत आणि त्याच व्हिडिओ आत्ता खूपच व्हायरल होत आहे. याबाबत पाटील हिला विचारल असता ती म्हणाली की मी कलाकार असून मी विविध ठिकाणी जाऊन माझी कला सादर करत असते. मला या गोष्टी काहीच माहित नसतात जे काही करायचं आहे ती माझी टीम पाहत असते असं यावेळी पाटील म्हणाली.
आत्महत्या प्रकरणात वैष्णवीच्या वडिलांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट
राज्यात सध्या वैष्णवी हगवणेचे आत्महत्या प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. सासरच्यांनी केलेल्या छळामुळे वैष्णवीने गळफास घेऊन आत्महत्या केली. पुणे जिल्ह्यातील २४ वर्षीय वैष्णवी हगवणे हिच्या संशयास्पद आत्महत्येप्रकरणी पुणे येथील दंडाधिकारी न्यायालयाने सोमवारी तीन आरोपींच्या पोलिस कोठडीत बुधवारपर्यंत वाढ केली. यामध्ये वैष्णवीचा पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे आणि नंनद करिश्मा यांचा समावेश आहे. फिर्यादी पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने हा आदेश दिला. त्यानंतर आज कस्पटे कुटुंबाने पत्रकार परिषद घेतली आहे.
आत्महत्या प्रकरणात वैष्णवीच्या वडिलांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, “हगवणेंनी दोन वेळा लग्न…”
अनिल कस्पटेंचा गौप्यस्फोट काय?
वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांनी हगवणे कुटुंबावर गंभीर आरोप केले आहे. आज त्यांनी या प्रकरणात पत्रकार परिषद घेतली. हगवणे कुटुंबाने दोन वेळेस वैष्णवीचे लग्न मोडले. मला नाईलाजाने माझ्या मुलीचे लग्न हगवणे कुटुंबात करून द्यावे लागले. फॉर्च्युनर मी स्वताहून दिली नव्हती. त्यांनी माझ्या मुळीच छळ करून गाडी मागितली.
आरोपींकडे 5 कोटींच्या गाड्या नाहीत. त्यांच्याकडे एकच गाडी आहे. मी दिलेली. वैष्णवीवर काहीही आरोप करून तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवू नका. पत्रकार परिषदेत बोलताना वैष्णवीच्या वडिलांना आपले अश्रू अनावर झाले होते.