शाळेतील मुख्याध्यापकाने मुलींच्या बाथरुममध्ये बसवला छुपा कॅमेरा (फोटो सौजन्य - X)
राजस्थानमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. राजस्थानमधील जयपूरमधील एका मुख्याध्यापकाने विद्यार्थ्यांसोबत असे कृत्य केले जे कोणालाही सहन होणार नाही. दर्शन कंवरच्या मुख्याध्यापकावर विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. पोलिस अजूनही या प्रकरणाचा तपास करत आहेत आणि गुरुवारी पोलिसांनी माहिती दिली की दिल्लीतील एका सरकारी पॉलिटेक्निक कॉलेजच्या प्राचार्यावर विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे.
वॉशरुममध्ये कॅमेरा बसवून विद्यार्थिनींचे व्हिडीओ काढल्याप्रकरणी जयपूरमधील महिला पॉलिटेक्निक कॉलेजचा माजी प्राचार्य मशकूर अली यास अटक करण्यात आली आहे. विद्यार्थिनींनीही त्याच्या विरोधात निदर्शने केली होती. पोलिसांनी त्याच्यावरील आरोपांना दुजोरा दिला आहे. विद्यार्थिनींनी केलेल्या आरोपांच्या आधारे चौकशीनंतर पोलिसांनी मशकूरला अटक केली. एसआयटी चौकशीत विद्यार्थीनींनी केलेले आरोप खरे असल्याचे स्पष्ट झाले होते. या प्रकरणी विद्यार्थिनींनीही त्यांचे जबाच नोंदवले होते.
विद्यार्थिनींनी सांगितले होते की, मशकूरने वॉशरूममध्ये कॅमेरा बसवला होता. त्यातून व्हिडिओ रेकॉर्ड केले जात होते. याप्रकरणी सुरुवातीला विद्यार्थिनी आणि महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांनी ३ फेब्रुवारी रोजी तंत्रशिक्षण विभागाच्या सचिवांकडे तक्रार केली होती. यानंतर चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली. तपासात दोषी आढळल्यानंतर मशकूरला निलंबित करण्यात आले. यानंतर, १० मार्च रोजी पुन्हा चौकशी समिती महाविद्यालयात चौकशीसाठी पोहोचली. तेव्हा विद्यार्थिनींनी निषेधार्थ निदर्शने केली होती. मशकूरला वाचवण्यासाठी पुन्हा चौकशी केली जात असल्याचा आरोप विद्यार्थिनींनी केला. विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, मशकूरची २०२३ मध्ये प्राचार्य म्हणून नियुक्ती झाली होती. तेव्हापासून तो विद्यार्थिनीशी गैरवर्तन करत होता.
बड्यांसोबत झोपावे लागेल : पीडित मुली म्हणाल्या की, आपले मोठ्या लोकांशी संबंध असल्याचे सांगून मशकूर म्हणायचे की, तुम्हाला इतर लोकांसोबत झोपावे लागेल, मी मुलींचा पुरवठा करतो.
मशकूर लायब्ररीच्या कोप-यात कपाटामागे बसायचा. याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची रेंज नव्हती. या जागेवर तो मुलीना घडत असे. याशिवाय, मशकूरने स्वत ला विद्यार्थिनीच्या वैयक्तिक व्हॉट्स अॅप ग्रुपमध्ये समाविष्ट केले होते. तो मुलीना अश्लील मेसेजही पाठवायचा, असेही मुलीनी जबाबात म्हटले आहे.
हायप्रोफाइल लोकांशी संबंध ठेवण्याचे खोटे आश्वासन देऊन मशकूर विद्यार्थिनींना त्याच्या गाडीत घेऊन जायचा आणि चालत्या गाडीत त्यांच्याशी गैरवर्तन करायचा. तसेच कोणी पोलिसांकडे किंवा त्यांच्या नातेवाईकांकडे तक्रार केली. तर तो त्यांचा व्हिडिओ व्हायरल करेल, अशी धमकीही मशकूर या विद्यार्थिनींना देत होता.