जालना जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. वाळू टाकण्याच्या वादातून वाळूमाफियांनी अपहरण करून एका तरुणाची हत्या केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. हत्या केल्यानंतर मृतदेह बुलढाणा जिल्ह्यातील तढेगाव येथे फेकून देण्यात आला. हत्या झालेल्या तरुणाचे नाव सुरेश आर्दड (३३) असे आहे. रविवारी सकाळी या तरुणाचा मृतदेह सापडला. याप्रकरणी बुलढाणा जिल्ह्यातील किनगाव राजा पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. फरार आरोपींचा शोध पोलीस सध्या घेत आहेत.
Indigo Flight: पुणे-हैदराबाद विमानाचे इमर्जन्सी लँडिंग; ‘या’ कारणामुळे प्रवाशांचा जीव टांगणीवर
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश आर्दड हा शनिवारी रात्री कुंभार पिंपळगाव येथील बाजार समितीच्या परिसरात थांबला होता. चार जण त्याच्या जवळ आले आणि त्याला बेदम मारहाण करत गावठी कट्टा व कुऱ्हाडीचा धाक दाखवत त्याचे कारमध्ये कोंबून अपहरण केले. गावठी पिस्तूल व कुऱ्हाड हातात घेत जीवे मारण्याची धमकी देत सुरेशला जबरदस्तीने गाडीत बसवून अज्ञात दिशेने नेले. 29 जून रोजी सकाळी बुलढाणा जिल्ह्यात किनगाव राजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका रस्त्यात या कडेला असणाऱ्या शेतात सुरेश अरदड चा मृतदेह सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली. घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता मृत व्यक्तीच्या डोक्याला मानेला आणि छातीवर तीव्र जखमा दिसून आल्या. प्राथमिक तपासात तरुणाचे नाव सुरेश तुकाराम अर्धड असल्याचे निष्पन्न झाले. हत्या करून पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह शेजारच्या जिल्ह्यात नेऊन फेकल्याचा संशय पोलिसांना आहे.
याप्रकरणी रात्री उशिरा मृत तरुण सुरेश आर्दड याचे चुलते सुभाष लळीतराव आर्दड यांच्या तक्रारीवरून संशयित हरी कल्याण तौर, सखाराम उर्फ खन्ना बप्पासाहेब अरदड व मिनाज बाबा मिया सय्यद तसेच एका कारचालका विरोधात घनसावंगी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणातील संशयी आरोपींविरुद्ध अपहरण खून व गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. फरार आरोपींना शोधण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली असून त्यांचा शोध सुरू आहे. या प्रकरणामुळे जालना जिल्ह्यात प्रचंड दहशतीचे वातावरण आहे. जालन्यातील गोदापट्ट्यात पुन्हा एकदा वाळू माफियांनी डोकं वर काढलं असून गुन्हेगारींच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे चित्र आहे. या घटनेनंतर जालना पोलीस सतर्क झाले आहेत.
Accident News : नगर रस्त्यावर भीषण अपघात; ट्रकवर टेम्पो आदळून चालकाचा मृत्यू