नेमकं काय प्रकरण?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतकाचे नाव प्रमोद आहे. तो आपल्या आई- वडिलांसोबत एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होता. प्रमोदचा मृत्यू झोपेत झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. मृत्यू झाल्यानंतरही घरातील ज्येष्ठ दाम्पत्य, कालीवा रामना आणि शांताकुमारी यांना मुलगा प्रतिसाद देत नाही असे समजत होते. तो झोपला आहे असे त्यांना वाटायचे. दोघंही वयोमानामुळे अशक्त झाल्याने आणि त्यांचा आवाज मंद असल्याने शेजाऱ्यांनाही काहीच कळाले नाही.
पुण्यात रक्तरंजित थरार! अल्पवयीन मुलावर चाकूने सपासप वार; नेमकं काय घडलं?
शेजार्यांना दुर्गंधी आल्याने समोर आला प्रकार
चार दिवसांनंतर शेजाऱ्यांना त्यांच्या घरातून दुर्गंधी येऊ लागली. एका शेजाऱ्यांने पोलिसांना तक्रार केली. पोलीस माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचले. तेव्हा घरात पोलिसांना प्रमोदच्या मृतदेह आणि त्याचे आई-वडिल थोडसे बेशुद्ध असल्याप्रमाणे दिसले. पोलिसांनी तात्काळ त्यांना जाग केले त्यांना पाणी आणि जेवण दिले. त्यांची प्रकृती सावरल्यानंतर पोलिसांनी त्यांना त्यांच्या मोठ्या मुलाकडे सोपवले.
प्रमोदला मद्यपानाची सवय
कालीवा रामना हे निवृत्त सरकारी कर्मचारी असून त्यांची पत्नी शांताकुमारी आणि त्यांचा लहान मुलगा प्रमोद यांच्यासोबत राहत होते. मोठा मुलगा दुसऱ्या शहरात राहतो. काही वर्षांपूर्वी प्रमोदच्या पत्नीने त्याला सोडून दिले होते. ती आपल्या दोन मुलींना सोबत घेत आपल्या माहेरी राहत होती. स्थानिकांच्या माहितीनुसार प्रमोदला मद्यपानाची सवय होती.
परिसरात हळहळ
पोलिसांनी प्रमोदचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी सरकारी रुग्णालयात पाठवला आहे. हा नैसर्गिक मृत्यू असल्याचे चौकशीत समोर आले आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Ans: हैदराबादच्या ब्लाइंड्स कॉलनीत ही घटना समोर आली.
Ans: घरातून येणाऱ्या दुर्गंधीवरून शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवले.
Ans: वयोमान, अशक्तपणा आणि परिस्थितीचे भान न राहिल्याने त्यांना मृत्यूची कल्पना नव्हती






