मुंबई: मुंबई पवईच्या आयआयटी येथे रविवारी एक धक्कादायक घटना घडली. पवईच्या आयआयटी येथे केमिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याने वसतिगृह इमारतीच्या ७ व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. दर्शन सोलंकी (१८) असे त्याचे नाव असून, याप्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करत तपास सुरू केला. मात्र या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे. दर्शन सोलंकी यांच्या बहिणीने “ही आत्महत्या नसून हत्या” असल्याचं म्हटलं आहे, त्यामुळं तर्कवितर्क काढले जात असून, जान्हवी सोलंकीच्या या दाव्यामुळं अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत.
“ही आत्महत्या नाही…”
“ही आत्महत्या नाही. हे खुनाचे स्पष्ट प्रकरण आहे. माझा भाऊ मानसिक आणि भावनिकदृष्ट्या मजबूत होता,” अलं जान्हवी सोलंकी हिने बुधवारी म्हटलं आहे. जान्हवी सोलंकी, ही 18 वर्षीय दर्शन सोलंकीची बहीण आहे, दर्शन सोलंकीने रविवारी कॅम्पसमध्ये आत्महत्या केली. तिने सांगितले की ती पोलिसांशी संपर्क साधला आणि त्यांना हत्येचा गुन्हा म्हणून चौकशी करण्यास सांगितले आहे. रविवारी केमिकल इंजिनीअरिंगच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्याने सोलंकी याने IIT-B पवई येथील वसतिगृह क्रमांक 16 च्या सातव्या मजल्यावरून उडी मारली. पवई पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून याप्रकरणी तपास सुरू आहे.
पोलिसांनी काय म्हटले?
पवई पोलिसांनी सांगितले की, “पालकांनी कॅम्पसमध्ये कोणत्याही जातीय भेदभावाचा उल्लेख केलेला नाही. एक गट कोणत्याही ठोस पुराव्याशिवाय अफवा पसरवत आहे. हे आरोप कुठून पसरले याची चौकशी सुरू करण्यात आली आहे,” असे पवई पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. “पालकांनी सांगितले की त्यांचा मुलगा मुंबईत शिकत नव्हता आणि त्यांना घरी परत यायचे होते. त्यांनी सांगितले की त्यांच्या मुलाचे सेमिस्टर संपल्यानंतर त्याच्या घरी जाण्यासाठी रेल्वेचे तिकीट बुक केले होते,” असे पोलीस म्हणाले.
शैक्षणिक दबावामुळे आत्महत्या?
सोलंकी हा मूळचा अहमदाबादचा राहणारा असून, पवईच्या आयआयटीमध्ये तो तीन महिन्यांपूर्वी आला होता. पवई पोलिस ठाण्याच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, दर्शन इतरांशी फारच कमी बोलायचा. त्याच्या रूम पार्टनरसोबतही त्याचा फार संवाद नव्हता. प्रथमदर्शनी असे दिसते की, त्याने एकटेपणाला कंटाळून हे पाऊल उचलले असावे. नुकताच आयआयटी पहिल्या सत्रामधील शेवटच्या परीक्षेचा समारोप झाला. पोलिसांचा असाही अंदाज आहे, की शैक्षणिक दबावामुळे त्याचा ताण वाढला असावा. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास वसतिगृहाच्या खिडकीत असलेल्या आणखी एका विद्यार्थ्याने त्याला सातव्या मजल्यावरील रिफ्युज एरियाच्या काठावर जाताना पाहिले.