सोलापूर: वैधकीय शिक्षण घेणाऱ्या एका तरुणीने गळफास घेत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. हि घटना सोलापुरातील आयएमएस शाळेसमोरील आहे. आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव साक्षी सुरेश मैलापुरे असे आहे. साक्षी ही सोलापुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षात शिकत होती. ती अभ्यासात हुशार आणि मेहनती होती. परंतु तिने एवढा टोकाचा निर्णय का घेतला? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या साक्षी सुरेश मैलापुरे ती केवळ २५ वर्षाची होती. ती आपल्या कुटुंबासोबत जुळे सोलापूर, आयएमएस शाळेजवळ राहत होती. तिने राहत्या घरी छताच्या पंख्याला स्कार्फच्या साह्याने गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. ही घटना मंगळवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास समोर आली आहे. साक्षीने गळफास घेतल्याचे सुरुवातीला आईला दिसले. आईने तत्काळ नातेवाईकांना हाक मारली आणि फासातून सोडवून शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केली. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.
साक्षी ही अभ्यासात अत्यंत हुशार, शांत आणि मेहनती विद्यार्थिनी होती. त्यामुळे तिच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेची नोंद विजापूर नाका पोलिस ठाण्यात करण्यात आली असून आत्महत्येमागील नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे. साक्षीने एवढ्या कमी वयात असा टोकाचा निर्णय का घेतला, याबाबत अनेक तर्क-वितर्क व्यक्त होत आहेत. पोलीस मात्र सर्व अंगांनी तपास करत असून, घटनास्थळाचा पंचनामा आणि मोबाइल तपासणीसह इतर पुरावे गोळा करत आहेत.या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
कारला ‘कट’ मारल्याने जीवघेणा हल्ला,मध्यरात्री रस्त्यावर राष्ट्रवादी कार्यकर्त्याचा खून
सोलापूर मधून एक थरारक घटना समोर आली आहे. सराईत गुन्हेगारांनी दारूच्या नशेत जीप चालविताना कारला कट दिल्याने वाद झाला, त्यानंतर शिवीगाळ करत जीवघेणा हल्ला केल्याचे समोर आले आहे. या हल्ल्यात अनमोल केवटे (रा. मंद्रुप, जि. सोलापूर) याचा जागीच मृत्यू झाला तर सोनाली भोसले (रा. अंत्रोली, जि. सोलापूर) या गंभीर जखमी आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना लातूर-सोलापूर मार्गावर बुधवारी मध्यरात्री घडली. या घटनेत विष्णू मामडगे यासह चौघांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे.
Pune Crime: घरात घुसून तलवारीने वार, महिला आणि मुलगा गंभीर जखमी; घटनेचा थरारक व्हिडिओ समोर