एका धक्कादायक घटनेने जळगाव जिल्हा हादरला आहे. जळगाव जिल्ह्याच्या एरंडोल तालुक्यात एका १३ वर्षीय मुलाची गळा चिरून हत्या करून त्याचा मृतदेह फेकून दिल्याची घटना खर्ची गावात घडली आहे. हि घटना नरबळीसाठी तर झाली नाही ना? असा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. तेजस महाजन असे मृत झालेल्या १३ वर्षीय मुलाचे नाव आहे. नेमकं काय हा प्रकार?
शाहरुखच्या एन्काऊंटरनंतर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; तब्बल 60 जणांना घेतले ताब्यात
काय घडलं नेमकं?
तेजस हा रिंगणगाव येथील रहिवासी होता. 16 जूनपासून तो बेपत्ता झाला होता. मुलगा सापडत नसल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. परंतु कुठेही काही माहिती मिळाली नाही. सोमवारच्या बाजारात संध्याकाळी फिरत असताना तेजसने एका दुकानावर जाऊन बिर्याणी घेतली .नंतर संध्याकाळी सात वाजल्यापासून तर कोणालाच दिसला नाही . बेपत्ता झाला .त्यामुळे गावात शोधकार्य सुरू झालं .जवळपास पहाटे तीन वाजेपर्यंत सर्वांनी तरुणाला शोधलं . पण तो सापडला नाही. अखेर आज ( १७ जून) रोजी एरंडोल पोलीस ठाण्यात तेजस हरवल्याची नोंद करण्यात आली होती.
बाजार परिसर थोडा आत असल्यामुळे तिथे कोणाचे लक्ष गेलं नाही. पोलिसांनीही परिसरात शोधाशोध सुरू केली होती. दरम्यान, खर्ची गावाजवळील एका शेतात एका व्यक्तीला तेजसचा मृतदेह आढळून आला. मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक तपासात त्याच्या गाळ्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचे स्पष्ट झाले. श्वानपथक आणि फॉरेन्सिक टीमलाही घटनास्थळी पाचारण करण्यात आलं. या घटनेमागे नेमकं कारण काय, याचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या अमानुष प्रकारामुळे संपूर्ण परिसरात भीतीच वातावरण निर्माण झालं आहे.
तेजसची हत्या नरबळीचा उद्देशाने तर करण्यात आली नाही ना, असा संशय आता ग्रामस्थांकडून व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा गुन्हा दाखल केला असून पोलीस तपास करत आहे. या अमानुष प्रकारामुळे संपूर्ण परिसरात नागरिकांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झालं आहे.
वर्दळीच्या पानशेतमध्ये दगडाने ठेचून आदिवासी तरुणाची हत्या, आरोपीचा शोध सुरु