हिंजवडीतील आयटी कंपनीकडून ४०० उमेदवारांची कोट्यवधींची फसवणूक (File Photo : Fraud)
अमरावती : नांदगावपेठ एमआयडीसीतील इंडो फॅब कंपनीतील कामगारांना पगार न मिळाल्याने कामगार कंत्राटदाराने नांदगावपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी कंपनीचे अध्यक्ष संदीप गुप्ता, सीईओ पंकज नरोला, उपाध्यक्ष प्रियांशू बलियान (वय 60) आणि एका महिलेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
हेदेखील वाचा : काँग्रेससह सारथी फाऊंडेशनच्या माध्यमातून रोहन सुरवसे पाटील यांचे 14 वर्षांपासून अविरत समाजकार्य सुरू
गाडगेनगर संकुलातील संतोष भवन गल्ली येथे राहणारे सचिन एकनाथ महाल्ले (वय 42) हे कामगार कंत्राटदार आहेत. त्यांनी नांदगावपेठ एमआयडीसीतील शाम इंडो फॅब कंपनीत मजुरीचे कंत्राट घेतले होते. त्यानुसार ते मजुरीचा पुरवठा करत असे. 2014 मध्ये सुरू झालेले काम नोव्हेंबर 2023 पर्यंत सुरू होते. परंतु, आरोपींनी डिसेंबर 2023 ते मे 2024 या कालावधीत मजुरीची बिले दिली नाहीत. त्यामुळे त्यांनी कंपनी प्रशासनाकडे अनेकदा दाद मागितली. मात्र, याकडे लक्ष दिले नाही.
वर्क ऑर्डरनुसार कंपनीला मजूर पुरवठा करण्यात आला होता. तरीही बिले दिली नाहीत. आपली फसवणूक झाल्याचे महाल्ले यांच्या निदर्शनास येताच त्यांनी शुक्रवारी (दि. 24) नांदगावपेठ पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली. नांदगावपेठ पोलिसांनी आरोपींविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
कामगारांचे उपायुक्त कार्यालयासमोर उपोषण
पगार न मिळाल्याने नांदगावपेठ एमआयडीसीतील श्याम इंडोफॅबच्या कामगारांनी आपल्या कुटुंबीयांसह कामगार उपायुक्त कार्यालयासमोर बेमुदत उपोषण केले होते. कंपनी 2015 पासून सेवा देत असल्याचे उपोषणकर्त्यांनी सांगितले. यावर्षी जानेवारी ते एप्रिलपर्यंत काम करूनही पगार झाला नाही. आर्थिक विवंचना असल्याचे सांगून सर्वांना घरी पाठवण्यात आले, असे कामगारांनी सांगितले.
राज्यात वाढताहेत गुन्हेगारीच्या घटना
राज्यातील वेगवेगळ्या भागातून फसवणुकीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातच आता शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने महिलेची सायबर चोरट्यांनी १५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर चोरट्यांवर फरासखाना पोलिसांनी गु्न्हा दाखल केला आहे. याबाबत 38 वर्षीय महिलेने फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.