देशातील कोर्टांना बॉम्बने उडवण्याची धमकी (फोटो- istockphoto)
देशातील अनेक कोर्टांना बॉम्बची धमकी
कोर्ट परिसरात उडाली खळबळ
सुरक्षेत मोठ्या प्रमाणात वाढ
नवी दिल्ली: आज सकाळी देशातील अनेक जिल्हा न्यायालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली. ईमेलद्वारे बॉम्बने उडवण्याची धमकी जिल्हा न्यायालयांना देण्यात आली आहे. यामुळे धमकी प्राप्त झालेल्या जिल्हा न्यायालयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
बॉम्बने उडवण्याची धमकी मिळताच कोर्ट परिसर त्वरित रिकामा करण्यात आला. बिहार, छत्तीसगड, मध्यप्रदेश,पंजाबमधील जिल्हा न्यायालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली. न्यायमूर्ती, अधिवक्ता आणि अन्य कर्मचारी सोडून सर्वांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे.
बिहारमधील जिल्हा न्यायालयांना मिळाली धमकी
बिहारमधील पटणा, किशनगंज, गयाजी, कोर्टाला देखील बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. अज्ञात व्यक्तीने इमेल पाठवत कोर्ट परिसरात आरडीएक स्फोटके लावली असल्याचे सांगितले. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली. तातडीने या ठिकाणी कोर्ट परिसर रिकामे करण्यात आले. बॉम्ब शोध पथक तातडीने या परिसरात दाखल झाले असून त्यांनी सर्च ऑपरेशन सुरू केले आहे.
छत्तीसगड, बिहार आणि मध्यप्रदेशमधील जिल्हा न्यायालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी प्राप्त झाली. बॉम्बची धमकी मिळताच सगळीकडे खळबळ उडाली. सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. परिसरात बॉम्ब शोध पथक तपास करत आहे. श्वान पथकाच्या मदतीने देखील तपास केला जात आहे. हा ईमेल कुठून आला आणि कोणी पाठवला याचा तपास केला जात आहे. सायबर पोलिस देखील याचा तपास करत आहेत.






