Crime News Live Updates
बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीचे अनेक धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. हत्या, अपहरण, लैंगिक अत्याचार, गावठी शस्त्रांचा वापर आणि किरकोळ कारणावरून होणाऱ्या मारहाणी यांचे प्रमाण झपाट्याने वाढत असल्याचे चित्र आहे. यामुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, बीडमध्ये गुन्हेगारीचं मूळ अधिक खोलवर रुजल्याचे दिसते. आता पुन्हा एकदा बीडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भांडण मिटवण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीला “तू आमचा वाद का मिटवतोस?” असा सवाल करत तिघांनी बेदम मारहाण केल्याची घटना भेंड टाकळी (ता. गेवराई) येथे घडली. मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव सतीश वाव्हाळ असे असून, या प्रकरणी तिघांविरोधात तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
16 Aug 2025 06:00 PM (IST)
दारू पिण्यास पैसे न दिल्याने एकाने आईवर चाकूने वार केल्याची घटना सिंहगड रस्त्यावरील सावित्रीबाई फुले वसाहतीत घडली आहे. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पर्वती पोलिसांनी मुलाला अटक केली आहे. कौशल्या पप्पू कांबळे (वय ५५, रा. सावित्रीबाई फुले वसाहत, सिंहगड रस्ता) असे गंभीर जखमी झालेल्याचे महिलेचे नाव आहे. या प्रकणी कौशल्या यांचा मुलगा कृष्णा (वय ३०) याला अटक केली आहे. याबाबत कृष्णाचा मोठा भाऊ बाबासाहेब (वय ३६) याने पर्वती पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
16 Aug 2025 05:40 PM (IST)
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई खराडी रेव्ह पार्टी प्रकरणात सध्या कोठडीत असलेला डॉ. प्रांजल खेवलकर आणखी अडचणीत सापडला आहे. संमतीशिवाय महिलेचे फोटो आणि व्हिडिओ काढल्याप्रकरणी त्याच्याविरोधात पुण्यातील सायबर पोलीस ठाण्यात नवा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. संमती न घेता व्हिडिओ आणि फोटो काढले, असा आरोप एका महिलेने तक्रारीत खेवलकरवर केला आहे. या तक्रारीनुसार सायबर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
16 Aug 2025 05:20 PM (IST)
सातारा शहरासह तालुक्यात घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जण बेपत्ता झाल्याच्या फिर्यादी संबंधित पोलिस ठाण्यांत दाखल करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, दि. १३ रोजी साडेपाचच्या सुमारास प्रकाश मारुती ननावरे (रा. देगाव, ता. सातारा) राहत्या घरातून कोणाला काही न सांगता निघून गेले आहेत. अधिक तपास पोलीस हवालदार पिसाळ करीत आहेत. दुसऱ्या घटनेत, दि. १२ रोजी ललित बाळासाहेब रसाळ (रा. यादोगोपाळ पेठ, सातारा) राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता निघून गेले आहेत. पोलिस हवालदार बोडरे अधिक तपास करीत आहेत.
16 Aug 2025 05:00 PM (IST)
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील एका ८ वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी आरोपीचे हॉटेल फोडले आहे. एकीकडे देश स्वातंत्र दिन साजरा करत होता तर दुसरीकडे शिरपूर तालुक्यात ८ वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार होत होता. या घटनेनंतर संतापाची लाट उसळली आहे. या प्रकणी तालुका पोलिसांनी आरोपी अनिल काळे (वय 28, व्यवसाय – हॉटेल) याला ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती पसरताच संतप्त नागरिकांनी आरोपी अनिल काळे याच्या शिरपूर साखर कारखान्याच्या समोर असलेल्या हॉटेलची तोडफोड केली.
16 Aug 2025 04:55 PM (IST)
लोकसभेतील विरोधी पक्षनेते तथा काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणात झालेले घोटाळे उजेडात आणले त्यानुसार अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने या संदर्भात आंदोलनात्मक कार्यक्रम हाती घेण्याचे निर्देश दिले आहे, देशातील सर्व जिल्हा मुख्यालयी 'मतदान चोर, खुर्ची छोड' हा नारा देऊन भव्य कॅडल मशाल मार्च आयोजित करण्यात आला असल्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर यांनी सांगितले. यावेळी वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी,सर्व विभागीय सेल व कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते. .
16 Aug 2025 04:40 PM (IST)
पुण्यात महिलांचं बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढत चालला आहे. आता देखील ९ दिवसांच्या बाळाला सोडून आई बेपत्ता झाल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील वाघोली परिसरातून २४ वर्षीय महिला बेपत्ता झाली आहे. बेपत्ता झालेल्या महिलेचं नाव पूजा खंबाट असं आहे. या महिलेने कुणालाही न सांगता घरातून बाहेर निघाली. बाहेर जातांना ती महिला सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. पोलीस कसून शोध घेत आहे. मिळालेल्या माहितीनुसार पूजा हिला ९ दिवसाचं बाळ आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे नुकताच सी-सेक्शन डिलेव्हरी झाली होती. पूजाचे टाके देखील काढले नसल्याची माहिती समोर येत आहे. अवघ्या ९ दिवसांच्या बाळाला सोडून पूजा गेली कुठे? असा प्रश्न समोर आला आहे.
16 Aug 2025 04:20 PM (IST)
महाराष्ट्रात खरोखर गुटखा विक्रीवर बंदी आहे का, असा प्रश्न पनवेल, उरण तालुक्यात खुलेआम सुरु असलेल्या गुटखा विक्रीमुळे विचारला जात आहे. पनवेल आणि उरण तालुक्यात शहरासोबतच ग्रामीण भागातल्या दुकानांनमध्येही सर्रासपणे गुटखा विक्री केली जात असूनही त्या विरोधात अन्न व औषधे प्रशासनाकडून कठोर कारवाई केली जात नाही. त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. महाराष्ट्रात जुलै २०१२ मध्ये गुटखा बंदी लागू करण्यात आली. शासनाच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत करण्यात आले. गुटख्यामुळे अनेकांना तोंडाचा कर्करोग होऊन मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. लोकांनी गुटख्यापासून दूर राहावे यासाठी शासनाकडून जनजागृती केली जात आहे. तरीही सर्रासपणे उरण, पनवेलमधील शहरी भागासह ग्रामीण भागातील टपऱ्या व दुकानांवरही सर्रास खुलेआम गुटखा विक्री जोरात सुरू आहे.
16 Aug 2025 04:09 PM (IST)
उल्हासनगर कॅम्प नंबर २ मधील दुर्गानगर परिसरात रात्री उशिरा दोन अज्ञात नशेखोर तरुणांनी २० ते २५ दुचाक्यांची तोडफोड करत परिसरात दहशत माजवली. ही संपूर्ण घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली असून परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही तरुणांनी मुद्दाम दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने गाड्यांची तोडफोड केली. त्यामुळे परिसरातील वाहनधारकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे.या प्रकरणी पोलिसांनी तातडीने लक्ष घालून संबंधित नशेखोर तरुणांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. घटनास्थळी अधिक सुरक्षा व्यवस्था वाढवून अशा प्रकारच्या घटनांना आळा घालावा, अशीही मागणी परिसरातील रहिवाशांनी केली आहे.
16 Aug 2025 04:05 PM (IST)
हिंजवडीतील राजीव गांधी आयटी पार्कमधील एका आयटी सल्लागार कंपनीने तब्बल ४०० उमेदवारांना सशुल्क प्रशिक्षण व हमखास नोकरीचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या फसवणुकीमुळे शेकडो आयटी कर्मचारी बेकार होण्याच्या मार्गावर असून, आयटी क्षेत्रात नोकरी शोधणाऱ्या नवोदितांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कंपनीने उमेदवारांकडून दोन महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी प्रत्येकी १ ते ३ लाख रुपये आकारले होते. त्यानंतर पुढील दोन महिन्यांसाठी १५ हजार रुपये मानधन आणि प्रशिक्षणानंतर ३ ते ४ लाख रुपये वार्षिक पगाराचे आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्षात प्रशिक्षण व मानधनाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर सलग चार महिन्यांपासून पगारच देण्यात आलेला नाही. अनेक कर्मचारी प्रोजेक्टवर काम करत असूनही वेतन थकल्याचे समोर आले आहे. याशिवाय, कंपनीचे कार्यालय बहुतेक वेळा बंद असल्याची माहितीही पीडित कर्मचाऱ्यांनी दिली. चौकशीसाठी कंपनीच्या मनुष्यबळ विभागाशी संपर्क साधल्यावर संबंधित अधिकाऱ्यांनी उलट पोलिसांना बोलावल्याचा आरोपही कर्मचाऱ्यांनी केला आहे.
16 Aug 2025 03:40 PM (IST)
सन्मती सहकारी बँक लिमिटेड इचलकरंजीच्या अब्दुललाट शाखेतील बोगस कर्ज प्रकरणात कोणतीही कारवाई झाली नाही. याच्या निषेधार्थ सचिन मेथे व त्यांची पत्नी संगीता मेथे यांनी १५ ऑगस्ट रोजी कुरुंदवाड पोलिस ठाण्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. दाम्पत्याने पोलिस ठाण्यासमोर डिझेल ओतून घेऊन स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी प्रसंगावधान राखून त्यांना ताब्यात घेतले. यावेळी पोलिस व तक्रारदार यांच्यात झटापटही झाली.
16 Aug 2025 03:25 PM (IST)
पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा, युनिट-३ च्या पथकाने आंतरराज्य सोनसाखळी चोरट्याला अटक करून तब्बल १२ लाख ३१ हजार रुपये किमतीचे १०.३ तोळे सोने व दोन दुचाकी जप्त केल्या आहेत. या चोरट्याने १५ गुन्हे केल्याची कबुली दिली असून, त्यापैकी अनेक गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त (गुन्हे) डॉ. शिवाजी पवार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सहायक पोलीस आयुक्त विशाल हिरे हेही उपस्थित होते. अक्षय राजू शेरावत (वय 26, हवेली, पुणे), ऋषी बुद्धिमान नानावत (वय 23, हवेली, पुणे), अरमान प्रल्हाद नानावत (वय 26, हवेली, पुणे), सोनु फिरोज गुडदावत (वय 20, शिरुर, पुणे) यांच्यासह खुषालसिंग जोधसिंग राव (वय ४३, रा. ठाणे) यांना अटक करण्यात आलेली आहे.
16 Aug 2025 03:05 PM (IST)
इचलकरंजी येथील मंगळवार पेठेत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (LCB) पथकाने एका घरावर छापा टाकून बनावट नोटा छापण्याचा कारखाना उद्ध्वस्त केला आहे. पोलिसांनी तिघांना अटक करून पोलिसांनी २ लाख २४ हजार २०० रुपयांच्या बनावट नोटा आणि ७० हजार ७०० रुपयांचे छपाईसाठी वापरलेले साहित्य असा एकूण २ लाख ९४ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
16 Aug 2025 03:00 PM (IST)
कोल्हापूरमधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका महाविद्यालयीन तरुणीने बसमधील अल्पवयीन मुलाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना कोल्हापूर येथील हातकणंगले तालुक्यातील किणी येथे घडली आहे. या घटनेची नोंद पेठवडगाव पोलिसात करण्यात आली आहे. आत्महत्या केलेल्या अल्पवयीन मुलीला न्याय मिळावा यासाठी गावात निषेद मोर्चा देखील काढण्यात आला आहे.
16 Aug 2025 02:45 PM (IST)
पुण्यात मद्यधुंद चालकाने चक्क ट्राफिक डिसिपीच्या गाडीलाच ठोकल्याचे समोर आले आहे. हा अपघात डीसीपी हिम्मत जाधव यांच्या गाडीची झाली आहे. या अपघातात डीसीपींची मुलगी किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना केशवनगरमध्ये काल (शुक्रवारी, ता 15) राञी दहा ते साडे दहा वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. मुंढवा पोलिसात मद्यधुंद चालकांविरोधात ड्रँक अँड ड्राईव्ह अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
16 Aug 2025 02:30 PM (IST)
बीडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भांडण मिटवण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीला तिघांकडून बेदम मारहाण करण्यात आली आहे. “तू आमचा वाद का मिटवतोस?” असा सवाल करत तिघांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली. ही घटना भेंड टाकळी (ता. गेवराई) येथे घडली आहे. मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव सतीश वाव्हाळ असे असून, या प्रकरणी तिघांविरोधात तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
16 Aug 2025 02:15 PM (IST)
जालन्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. जालनाच्या डीवायएसपींनी आंदोलन कर्त्याच्या पार्श्वभागावर लाथ मारल्याचे समोर आले आहे. याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. जालन्यात एक कुटुंब जिल्ह्यादखिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत होते. यावेळी सुरु असलेल्या आंदोलन स्थळावरून एका कुटुंबाने पंकजा मुंडेंना भेटण्याचा प्रयत्न केला पण यावेळी पोलिसांनी अडवलं. पोलीस उपाधीक्षक अनंत कुलकर्णी यांनी संबंधित आंदोलकांच्या कमरेत मागून लाथ मारली. याचा व्हिडीओ समोर आला आहे.
16 Aug 2025 01:55 PM (IST)
अमरावतीमध्ये स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणावर अॅसिड हल्ला झाला आहे. अॅसिड हल्ला करणारे दोघे जण होते. आधी त्या दोन अज्ञात व्यक्तींनी त्याला अडवून मारहाण केली त्यानंतर त्याच्याकडील रोक रक्कम, मोबाईल आणि इतर वस्तू हिसकावून घेत अॅसिड फेकलं. अॅसिड हल्ला झालेल्या तरुणाचे नाव अमोल इसाळ आहे. तो मूळचा यवतमाळ जिल्ह्यातील बाबुळगावचा आहे. अमोलवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
16 Aug 2025 01:40 PM (IST)
श्रीकृष्ण जयंती आणि दहीहंडी उत्सवानिमित्त पुणे शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. वरिष्ठ अधिकारी यांच्यासह चार हजार पोलिसांचा फौजफाटा रस्त्यावर तैनात असणार आहे. त्यासोबतच शहरातील वाहतूकीत देखील बदल केला असून, वाहन चालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. दोन दिवस हा वाहतूक बदल केला असून, शिवाजीरोड, लक्ष्मीरोड, बाजीराव रोड, टिळक रोडवर श्रीकृष्ण जयंती व दहीहंडी उत्सवानिमित्त दहीहंडी फुटेपर्यंत भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. यामुळे रस्त्यांवर कुठेही वाहतुकीची कोंडी होऊ नये व वाहनचालकांची गैरसोय होऊ नये यासाठी वाहतूक शाखेने आवश्यक वाहतूक बदल केला आहे. याबाबतचे आदेश पोलिस उपायुक्त हिंमत जाधव यांच्या आदेशाने काढण्यात आले आहेत.
16 Aug 2025 01:20 PM (IST)
शेअर मार्केट तसेच आयपीओबाबत व्हॉट्सअप पीडीएफद्वारे माहिती देऊन तसेच जास्त परतावा देण्याच्या आमिषाने दोघांना तब्बल ९० लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सायबर व नांदेडसिटी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुणे शहरात सातत्याने सायबर फसवणूकीचे प्रकार घडत आहेत. वारंवार पोलिस तसेच प्रशासनाकडून जास्त परताव्याच्या आमिषाला बळी पडू नये, यासाठी प्रभोदन केले जात असताना फसवणूकीचे सत्र कायम आहे.
16 Aug 2025 01:20 PM (IST)
मुंबईच्या परेलमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका डिलिव्हरी बॉयकडे पाहून माथेफिरूने एयर रायफलने हवेत गोळीबार केल्याची घटना घडली आहे. सतत बेल वाजवून त्रास देत असल्याच्या रागातून या व्यक्ती हवेत गोळीबार केल्याचे समोर आले आहे. ही घटना मुंबईच्या परळ येथील नित्यानंद कॉलनीतील प्रकाश कॉटन बिल्डिंगमध्ये शुक्रवारी सायंकाळी घडली आहे. गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचे नाव सौरभकुमार अविनाशकुमार सिंग असे आहे.
16 Aug 2025 01:00 PM (IST)
गुन्हेगारांना पिस्तूलांचे व्यसन जडावे असाच काहीसा प्रकार पुण्यात पाहिला मिळत असून, खून, वाहन तोडफोडी यासारख्या गंभीर गुन्ह्यांतून जामिनावर बाहेर आल्यानंतर लागलीच काही जणांनी पिस्तूलांचा साठा बाळगल्याचा प्रकार पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने उघडकीस आणला आहे. पोलिसांनी छापेमारी करून चौघांना बेड्या ठोकत त्यांच्याकडून चार देशी बनावटीची पिस्तुले आणि पाच जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. गुन्हे शाखा यूनिट सहाच्या पथकाने वाघोलीतील भावडी रोडवरील मोकळ्या जागेत ही कारवाई करण्यात आली आहे. सूरज उर्फ नन्या संतोष मोरे (१९, रा. वाघोली), ओमकार अरुण नादवडेकर (१९, रा. वाघोली), जगदीश उर्फ जॅक्स शंकर दोडमनी (२४), स्वयंम उर्फ आण्णा विजय सुर्वे (१९, रा. येरवडा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी वाघोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
16 Aug 2025 12:40 PM (IST)
राज्यासह देशभरात चोरीचे प्रमाण वाढले असून, पंढरपूर शहरातील एका घरातून सोने-चांदीच्या दागिन्यासह रोख रक्कम चोरी झाली होती. याप्रकरणी गुन्हे प्रकटीकरण शाखेने एका महिलेला अटक केली आहे. तिच्याकडून चोरलेले सोने-चांदीच्या दागिन्यांसह ८ लाख ८१ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना जिल्हा पोलिस प्रमुखांनी दिल्या होत्या. त्यानूसार गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांच्या विशेष पथकाची नेमणूक करण्यात आली. संबधित पथक पंढरपूर शहर व परिसरात तपास करत होते. तपासात फिर्यादीच्या राहत्या घरात केअर टेकर म्हणून काम करणाऱ्या महिलेनेच घरात कोणी नसल्याचा फायदा घेऊन चोरी केल्याचा संशय बळावला. त्याअनुषंगाने महिलेस विश्वसात घेवून तपास केला असता तिने गुन्हा केल्याची कबुल दिली. त्यानंतर पोलिसांनी चोरलेले दागीने व चांदीच्या वस्तू असा एकूण ८ लाख ८० हजार ७०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.
16 Aug 2025 12:20 PM (IST)
पुणे शहरात घरफोड्यांचे सत्र सुरू असतानाच चोरटे आता उघड्या दरावाजातून आत शिरत घरातून किंमती ऐवज चोरू लागले आहेत. चतु:शृंगी, वाघोली आणि कोंढव्यात प्रत्येकी एका ठिकाणी घराच्या उघड्या दरवाजातून प्रवेश करून चोरट्यांनी सुमारे पाच लाख रुपये किमतीचे दागिने, लॅपटॉप व मोबाइल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. घरातील नागरिक झोपेत असताना, तसेच घरातील वृद्ध महिला एकटी असताना चोरट्यांनी ही कृत्ये केली आहेत.
16 Aug 2025 12:05 PM (IST)
पुण्यातील दोन वेगवेगळ्या भागात गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील दागिने आणि रोख रक्कम चोरल्याच्या घटना घडल्या आहेत. दोन्ही प्रकरणांत अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिली घटना १२ ऑगस्टला दुपारी साडेतीन ते चारच्या दरम्यान कात्रज चौक ते वारजे-माळवाडी या प्रवासादरम्यान घडली आहे. एक ५८ वर्षीय महिला रिक्षाने प्रवास करत असताना, अज्ञाताने गर्दीचा फायदा घेत त्यांच्या पिशवीतील पाकिटातून एक लाख पाच हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी आंबेगाव पोलिस ठाण्यात कलम ३७९ अंतर्गत गुन्हा दाखल आहे. दुसरी घटना १३ ऑगस्टला सकाळी साडेनऊच्या सुमारास हडपसर येथे रवीदर्शन बस थांब्यावर घडली आहे. याबाबत एका ५४ वर्षीय महिलेने हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार या एसटी बसमध्ये चढत असताना, गर्दीचा फायदा घेत अज्ञाताने त्यांच्या गळ्यातील दीड लाख रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र लंपास केले. अधिक तपास पोलिस करत आहेत.
16 Aug 2025 11:45 AM (IST)
राज्यासह देशभरात चोरट्यांचा सुळसुळाट वाढला असून, सुरक्षित म्हणवणाऱ्या पुण्यातही दररोज चोरीच्या घटना घडत आहेत. चोरटे दररोज महिलांना टार्गेट करुन दागिने चोरत आहेत. पुणे शहरात दागिने हिसकावणाऱ्या चोरट्यांनी उच्छाद घातला असून, आंबेगाव, कात्रज आणि वारजे माळवाडी परिसरात पादचारी महिलांकडील दीड लाखांचे सोन्याचे दागिने दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना घडली आहे.
16 Aug 2025 11:43 AM (IST)
मुंबईतील गोरेगाव परिसरात एका प्रसिद्ध बिल्डरच्या मुलीने इमारतीच्या 23 व्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्य केली आहे. 14 ऑगस्टला दुपारी आई-वडील घराबाहेर गेले असताना तिने हे टोकाचं पाऊल उचललं. गोरेगाव पश्चिमेला असणाऱ्या ओबेरॉय स्क्वायर या इमारतीमध्ये ती राहत होती.