Crime News Live Updates
यवतमाळच्या पांढरकवडा तालुक्यातील सायखेडा मधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात चक्क ग्रामपंचायत कार्यालय फोडून महत्त्वाचे दस्तऐवज जाळल्याचा प्रकार उघडकीस आला. विशेष म्हणजे दुसऱ्यादिवशी ग्रामसभा असताना हा प्रकार घडल्याने सर्वत्र एकच खळबळ उडालीय. दरम्यान, भ्रष्टाचार उघडकीस येऊ नये, यासाठी हा प्रकार असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून हे कृत्य करणाऱ्याचा शोध घेतला जात आहे.
26 Aug 2025 05:30 PM (IST)
नाशिक शहरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात एका खासगी शिकवणीसाठी बाहेर गेलेल्या 16 वर्षीय मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. काल (25 ऑगस्ट) सकाळी 8 वाजता शहरातील सारडा सर्कलवर हा प्रकार घडलाय. ज्यामध्ये पांढऱ्या थार कारमधील एका व्यक्तीने मुलीला गाडीत बसण्यास सांगितले, परंतु मुलीने त्याकडे लक्ष न देता पुढे चालत राहिली. संशयिताने मुलीचा पाठलाग केला आणि मुलीला परत गाडीत बसण्याकरिता तिच्यावर दबाव आणला. सुदैवाने, यात मुलीने एका वृद्ध व्यक्तीच्या पाठीमागे लपून आपला जीव वाचवला. दरम्यान, हि घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून या ठिकाणी असलेल्या स्थानिक नागरिकांमुळे अपहरणाचा प्रकार फसलाय.
26 Aug 2025 05:10 PM (IST)
गुजरातमधून तीन वर्षांच्या मुलाचे अपहरण करून त्याला मुंबईत आणणाऱ्या, ट्रेनमध्ये त्याची हत्या करून मृतदेह फेकून देणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. सोमवारी अमरेली पोलिसांनी आरोपीला अटक केली. अटक केलेल्या आरोपीचे नाव विकास शाह आहे. आरोपी विकास हा मृत मुलाचा मावसभाऊ असल्याची माहिती समोर आली आहे.
26 Aug 2025 04:55 PM (IST)
मुंबईच्या मरिनड्राईव्ह परिसरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. नरिमन पॉईंट येथील समुद्रात एका तरुणीचा मृतदेह सापडल्याची घटना घडली आहे. शिवाय या तरुणीच्या चेहऱ्यावर जखमेच्या खुणा देखील दिसून येत आहे. घटनेची माहिती मिळताच कफ परेड पोलिसांनी घटनास्थळ गाठत पुढील तपास सुरु केला आहे. मात्र हि हत्या आहे कि आत्महत्या हे अद्याप कळू शिकलेलं नाहीये. सध्या पोलीस या घटनेचा त्या दिशेने तपास करत असून या घटनेने परिसरात एकाच खळबळ उडाली आहे.
26 Aug 2025 04:33 PM (IST)
Maharashtra Government: मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील हे आक्रमक झाले आहेत. 29 तारखेला मुंबईत ते धडक देणार आहेत. आरक्षण घेतल्याशिवाय माघारी फिरणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. दरम्यान आज राज्य सरकारची मंत्रीमंडळ उपसमितीची बैठक पार पडली. या उपसमितीचे अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आहेत. दरम्यान या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
26 Aug 2025 04:15 PM (IST)
मध्य प्रदेशमधून देखील एक अत्यंत हादरवणार प्रकार समोर आला आहे. तिथे एका नवविवाहीत महिलेशी तिचा पती आणि सासरच्या लोकांनी जे वर्तन केलंय ते पाहून हैवानालाही लाज वाटेल. पतीने फक्त तिला मारहाण केली नाही तर गॅसवर चाकू गरम करून, त्याच चाकूने तिच्या शरीरावर विविध ठिकाणी चटके दिले. रविवारी घडलेल्या या भयानक घटनेत तिच्या पतीने हात, पाय, पाठ आणि ओठांवरही तिला चटके दिले असून ती गंभीर जखमी झाली आहे. खूशबू असं पीडित महिलेचं नाव आहे.
26 Aug 2025 03:55 PM (IST)
26 Aug 2025 03:35 PM (IST)
ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई डॉ. प्रांजल खेवलकर ड्रग्ज पार्टीप्रकरणात मोबाईलमधील पुराव्यांशी 'जळगावा'तून छेडछाड झाल्याचा धक्कादायक प्रकार पोलिसांच्या तपासातून समोर आला आहे. डॉ. खेवलकर दोन मोबाईल वापरत असताना त्यातील एक मोबाईल क्रमांक हा त्रयस्त व्यक्तीच्या नावे होता. त्यामोबाईलमधील पुराव्यांशी छेडछाड झाल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तत्पुर्वी पोलिसांना या आधारे डॉ. खेवलकर याच्या जामीनाला न्यायालयात विरोध केला आहे. पुणे पोलिसांनी त्यांच्या जामीन अर्जास न्यायालयात सोमवारी (२५ ऑगस्ट) विरोध दर्शवला.
26 Aug 2025 03:20 PM (IST)
केंदूर (ता. शिरुर) येथे माजी सरपंच अमोल थिटे यांच्या हॉटेलमध्ये जाऊन काहीही कारण नसताना त्यांना शिवीगाळ, दमदाटी करत खुर्च्या व पाण्याच्या बकेटने मारहाण करत त्यांच्या खिशातील पन्नास हजार रुपये लांबवल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अक्षय बाजीराव साकोरे, सोमनाथ पांडुरंग साकोरे, आनंद नागेश भंडारी, वैभव बाळासाहेब गोरे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
26 Aug 2025 02:40 PM (IST)
कुशीनगर एक्सप्रेसच्या (ट्रेन क्रमांक २२५३७) एसी कोच बी२ च्या बाथरूममध्ये एका मुलाचा मृतदेह मिळाला होता. या मृत्यूदेहमागचं गूढ उकलल आहे. गुजरातमधून तीन वर्षाच्या मुलाचे अपहरण करून त्याला मुंबईत आणणाऱ्या, ट्रेनमध्ये त्याची हत्या करून मृतदेह फेकून देणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. अमरेली पोलिसांनी सोमवारी आरोपीला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव विकास शाह आहे. आरोपी विकास हा मृत मुलाचा मावसभाऊ असल्याची माहिती समोर आली आहे.
26 Aug 2025 02:20 PM (IST)
कर्नाटकातील चिक्कमंगलुरूमध्ये 60 वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. पतीच्या निधनाची बातमी ऐकून त्याच्या बायकोने हाय खाल्ली, रडत रडत ती शोक करू लागली. मात्र त्यानंतर धक्कादायक समोर आलं आणि सगळेच चक्रावले. कर्नाटकातील चिक्कमंगलुरूमध्ये सुब्रमण्यम (वय 60) असे मृत इसमाचे नाव असून त्याच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी सांगितले की, त्यांची पत्नी मीनाक्षम्मा (वय ५६) तिचा प्रियकर आणि इतर दोघांना दोन महिन्यांपूर्वी बेपत्ता झालेल्या सुब्रमण्यमच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. पत्नीवर तिच्या प्रियकरासह तिच्या पतीची हत्या करण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली आहे आणि या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
26 Aug 2025 02:00 PM (IST)
नांदेडमधून एक धक्कदायक प्रकार समोर आला आहे. जन्मदात्या वडिलांनी आपल्या विवाहित मुलीची आणि तिच्या प्रियकराची हत्या केल्याचे समोर आले आहे. हत्या केल्यानंतर तिच्या प्रियकराची हत्या करून मृतदेह चाळीस फूट खोल आणि वीस ते तीस फूट पाणी असलेल्या विहरीत फेकले. त्यानंतर स्वतः पोलीस ठाण्यात हजार होऊन घटनेची माहिती दिली. ही घटना नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील गोळेगाव येथे घडली आहे. हत्या झालेल्या मुलीचे नाव संजीवनी कमळे (वय 19 वर्ष) आणि लखन बालाजी भंडारे (वय 19) अशी मयतांची नावे आहेत. पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने मुलीचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढले, तर मुलाचा शोध सुरूच होता. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.
26 Aug 2025 01:40 PM (IST)
नाशिक मधून एक धक्कदायक बातमी समोर आली आहे. एका १६ वर्षीय मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्याचा खळबळजनक प्रकार नाशिक शहरातून समोर आला आहे. पांढऱ्या थारमधील एका व्यक्तीने मुलीला गाडीत बसण्यास जबरदस्ती केल्याचे समोर आले आहे. सुदैवाने त्या मुलीने एका वृद्ध व्यक्तीच्या पाठीमागे लपून आपला जीव वाचवला. हा प्रकार काल (25 ऑगस्ट) सकाळी 8 वाजताच्या सुमारास सरडा सर्कलवर घडला आहे. पीडित मुलगी ही एका खासगी शिकवणीसाठी बाहेर गेली होती.
26 Aug 2025 01:20 PM (IST)
नाशिक मधून एक संतापजनक घटना समोर आली आहे. महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीला जबरदस्तीने प्रेमसंबंध ठेवण्यास सांगून सातत्याने तिचा छळ करण्यात येत होता. तसेच इंस्टाग्रामवर फोटो ठेवून बदनामी तिची बदनामी करण्यात आली. या बदामी आणि सातत्याच्या त्रासाला कंटाळून एका मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
26 Aug 2025 12:45 PM (IST)
यंदाच्या गणेशोत्सवासाठी पुणे पोलिसांनी कायदा सुव्यवस्था आणि सुरळीत वाहतुकीसाठी सात हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात केला आहे. यंदा पुणे पोलिसांनी यासोबतच तंत्रज्ञानाचा देखील मोठा वापर केला आहे. त्यामध्ये ५० मेटल डिटेक्टर गेटस्, १५० हँड हेल्ड डिटेक्टर बसविणे, मेट्रो स्थानक परिसरात गर्दी नियंत्रणासाठी स्वतंत्र यंत्रणा, दंगा नियंत्रण प्रात्यक्षिके, अशा ठोस उपाययोजना करण्यात आल्या आहेत. गणेशोत्सवाला (दि. २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर) बुधवारपासून सुरूवात होत आहे. या काळात पुण्यात मोठा उत्साह असतो. यंदा ३९५९ सार्वजनिक मंडळे गणेशोत्सव साजरा करत आहेत, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त आयुक्त मनोज पाटील, राजेश बनसोडे, पंकज देशमुख, उपायुक्त निखिल पिंगळे, हिंमत जाधव आणि डॉ. संदीप भाजीभकरे उपस्थित होते.
26 Aug 2025 12:25 PM (IST)
खराडी परिसरात अंडाभुर्जीच्या गाडीवर किरकोळ वादातुन दोघांनी एका तरुणावर कोयत्याने हल्ला केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. डोक्यात व तोंडावर वार केल्याने तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. रोहन माने (वय २२, रा. मुंढवा झेड कॉर्नर) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचा मित्र रोहित तानाजी चौगुले (वय २६, रा. सणसवाडी चौक सणसवाडी) याने तक्रार दिली आहे. त्यानुसार खराडी पोलिसांनी दोघावर खूनाच्या प्रयत्नचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना रविवारी (दि. 24) रात्री पावने बारा ते एक वाजताच्या सुमारास रिलायन्स मार्ट समोर रिलायन्स चौक खराडी येथे घडली आहे.
26 Aug 2025 12:05 PM (IST)
पुण्यातून एक चोरीची घटना उघडकीस आली आहे. सिंहगड रस्त्यावरील सोसायटीतील फ्लॅट फोडून साडे आठ लाखांचा ऐवज चोरी झाला होता. याप्रकरणात सुरक्षा रक्षकच चोरटा निघाला असून, याप्रकरणाचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. सुरक्षा रक्षकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. राकेशकुमार मूलचंद सोनी (वय २९, रा. राम अमिलिया, जि. अनुपपूर, मध्य प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक नंदकुमार गायकवाड, गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक अनिता हिवरकर, उपनिरीक्षक किरण पवार, पोलिस कर्मचारी प्रकाश मरगजे व त्यांच्या पथकाने केली आहे.
26 Aug 2025 11:58 AM (IST)
वैभवशाली गणेशोत्सावाने पुण्यनगरीचे वातावरणात भक्तीमय झालेलं आहे. “जय गणेशा”च्या गजराने पुण्यनगरी उजळली जात असताना मात्र, दुसरीकडे शहर “कोयत्याच्या टोकावर थरथरत” आहे. गेल्या काही महिन्यांत घडत असलेल्या कोयत्याचे हल्ले, तोडफोडीचे सत्र अन् रक्तांच्या धारांच्या खेळाने पुणेकरांत दहशतीचे काळे सावट पसरलेले आहे. दोन गटातील वाद आणि त्यामुळे होणारे हल्ले, रस्त्यातील टोळीबाजी आणि किरकोळ वादातून वाहणारे रक्त या सगळ्याने “सुरक्षित पुणे”च्या प्रतिमेला जबर धक्का बसला जात आहे. काही केल्याने घटना पोलिसांना थांबवता येत नसल्याने आता सर्व सामान्य पुणेकर “लाडक्या बप्पा”लाच पुण्यनगरीतला गुन्हेगारीचा खेळ थांबव, अशी आर्त हाक मारू लागले आहे. गेल्या ७ महिन्यात ३३६ कोयत्याने हल्ले व गोळीबाराच्या १० घटना घडल्या आहेत.
26 Aug 2025 11:38 AM (IST)
विवाहित महिलेला घरी एकटेच पाहून तिच्या घराबाहेर जात तिच्याशी लगट करत विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एकाला लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली आहे. मुबारक मोळम्मद शेख (२५, रा. घोरपडेवस्त, लोणी काळभोर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत एका २८ वर्षीय तरूणीने तक्रार दिली आहे. (दि. २२ ऑगस्ट) दुपारी साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला आहे.
26 Aug 2025 11:25 AM (IST)
उद्या घरोघरी गणरायाचे आगमन होणार आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फुलांच्या बाजारपेठा सजल्या आहेत. बाजारामध्ये झेंडूच्या फुलांना विशेष मागणी आहे. गणरायाच्या आगमनासाठी फुलांच्या मागणीत वाढ झाली आहे.
26 Aug 2025 11:17 AM (IST)
वडगाव मावळ तसेच सातारा, रायगड जिल्ह्यातील कुख्यात गुंड किरण मोहिते याच्यासह साथीदारांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी हे आदेश दिले आहेत. किरण एकनाथ मोहिते (वय २९, रा. व्हिजन वुडस, जांभुळ ता. मावळ), एकनाथ अर्जुन मोहिते (वय ५३ रा. जांभुळ ता. मावळ) रविंद्र लक्ष्मण मोहिते (वय ३३ रा. कुडेवाडा, वडगाव मावळ), मयुर ऊर्फ चण्या बजरंग मोढवे (वय २६, रा. ढोरेवाडा, वडगाव मावळ ) करण रमेश पवार (वय २५, रा. टाकवे बुदुक, ता. मावळ ) सुशांत अनिल साबळे (वय २४, रा. केशवनगर, वडगाव मावळ) अशी मकोका कारवाई केलेल्यांची नावे आहेत. टोळीप्रमुख किरण मोहिते पसार असून, त्याचा शोध घेण्यात येत आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे अधिक तपास करत आहेत. पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.






