अकोला शहरातील बियाणी चौक परिसरात ९ सप्टेंबर २०२५ रोजी ईद-ए-मिलादुन्नबीची मिरवणूक काढण्यात आली होती. त्यावेळी एका वादग्रस्त प्रकारामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या मिरवणुकीत ८ – १० अनोळखी इसमांनी औरंजेबाच्या पोस्टरवर दुग्धाभिषेक केल्याचे समोर आले आहे. याचा एक व्हिडीओ १२ सप्टेंबर रोजी सोहस्ल मीडियावर व्हायरल झाला असून त्या ८ – १० अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ईडी कारवाईची भीती दाखवून महिलेची फसवणूक; तब्बल 32 लाखांना घातला गंडा
या प्रकारामुळे जिल्हाधिकारी यांच्याद्वारे दिलेल्या आदेशांचे उल्लंघन झाले असून, हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याचे पो.ह.वा. आशिष अशोक सुगंधी यांनी आपल्या लेखी तक्रारीत नमूद केले आहे. या घटनेमुळे शहरातील शांतता व धार्मिक सलोखा धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाल्याने सिटी कोतवाली पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
ही घटना ९ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास बियाणी चौकातील नटराज व कन्हैया ड्रेसेससमोर घडली होती. या तक्रारीवरून अज्ञात आठ ते दहा इसमांविरोधात गुन्हा सिटी कोतवाली पोलीस स्टेशनला रजि. नं. 258/25, भारतीय दंड संहिता 196 व BNS च्या कलम 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींचा शोध सुरु
या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल इंगोले करत असून, दाखला अधिकारी म्हणून हेड कॉन्स्टेबल सोपान डाबेराव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलिसांनी सदर व्हिडीओ व पुरावे तपासण्यास सुरुवात केली असून, आरोपींचा शोध सुरू आहे. शहरातील शांतता कायम राखण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अकोल्यात सासरवाडीतच जावयाचा धारदार शस्त्राने खून; कौटुंबिक वादातून हत्या
दरम्यान, जावयाचा धारदार शास्त्राने हत्या करण्यात आल्याची घटना अकोला जिल्ह्यातून समोर आली आहे. हत्या त्यांच्या सासरवाडीत झाल्याने गावात तणावपूर्ण वातावरण आहे. ही हत्या कौटुंबिक वादातून करण्यात आल्याचे समोर आले आहे. ही घटना अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील अंबाशी गावात बुधवारी संध्याकाळी 6:00 वाजता घडली. हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव पायरुजी गोपनारायण (वय 40, रा. कानशिवनी, ता. अकोला) असे आहे.