संभाजीनगरमध्ये ग्रामसेविकेवर अत्याचार; विविध ठिकाणी नेत अश्लील व्हिडिओ, फोटही काढले (फोटो सौजन्य: iStock)
शिक्रापूर : रांजणगाव गणपती (ता.शिरुर) येथील युवती घरात असताना तिच्या ओळखीतील ज्ञानेश्वर धनके घरात आला. त्याने युवतीची आई घरात नसल्याचे पाहून युवतीला पकडून तिच्याशी अश्लील वर्तन करत बळजबरीने अत्याचार केला. त्यानंतर युवतीने घडलेला प्रकार तिच्या आईला सांगितला. याप्रकरणी पोलिसांतही तक्रार देण्यात आली. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पीडित युवती घरात असताना तिच्या ओळखीतील ज्ञानेश्वर धनके घरात आला. मात्र, त्यावेळी तिची आई घरी नव्हती. यादरम्यान आरोपीने तिच्याशी गैरवर्तन करत बळजबरीने अत्याचार केला. पीडित युवतीच्या आईने ज्ञानेश्वर याच्याकडे याबाबत विचारपूसही केली. त्यावेळी त्याने युवती व युवतीच्या आईला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली.
हेदेखील वाचा : विवाहाच्या आमिषाने महिलेवर अत्याचार; पुण्यातील धक्कादायक प्रकार उघडकीस
याबाबत पीडित युवतीच्या आईने रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी ज्ञानेश्वर अंकुश धनके (वय ४०, रा. सिंदफळ ता. तुळजापूर जि. धाराशिव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मुंढे हे करत आहे.
लग्नाच्या आमिषाने महिलेवर अत्याचार
दुसऱ्या एका घटनेत, विवाहविषयक नोंदणी संकेतस्थळावरुन झालेल्या ओळखीतून एका उच्चशिक्षित महिलेवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपीने उच्चपदस्थ अधिकारी असल्याची बतावणी करुन महिलेची ३८ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी आरोपीविरुद्ध अत्याचार तसेच फसवणूक केल्याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका ३७ वर्षीय महिलेने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हेदेखील वाचा : धक्कादायक ! 28 वर्षीय विवाहितेचा मृतदेह विहिरीत आढळला; अंगावर मारहाणीचे व्रण असल्याचा नातेवाईकांचा आरोप
राज्यात वाढतंय अत्याचाराचं प्रमाण
गेल्या काही दिवसांपूर्वी फेसबुकवर झालेली ओळख एका महिलेला चांगलीच महागात पडली. ओळखीचा फायदा घेऊन या विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर तरूणाने अत्याचार केला. आरोपीने महिलेला घटस्फोट झाल्यानंतर ‘तुझ्यासोबत लग्न करेन’, असे आमिष दाखवून अत्याचार केला. याबाबत खामगाव शहर पोलिसांनी तरुणाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. या सर्व घटना पाहता राज्यात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढत असल्याचे दिसत आहे.