पुण्यातील राजगुरूनगर जवळील चांडोलीत अल्पवयीन तरुणीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुलगी आचाऱ्याला आचारी कामात मदत करत होती. त्याच आचारी ने मुलीसोबत अत्याचार केल्याचे समोर आलं आहे. आता, चांडोली येथील केदारेश्वर बंधाऱ्यावर या मुलीची ओढणी आणि चप्पल आढळून आल्याने पीडित मुलीने आत्महत्या केली काय ? अशी शंका उपस्थित होत असून सध्या बंधाऱ्यात मुलीचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपीची कसून चौकशी सुरु आहे.
पीडित तरुणी अत्याचार झाल्यानंतर ३ दिवसापासून बेपत्ता आहे. या घटनेनंतर NDRF च्या दोन टिमकडून भीमा नदीवरील केदारेश्वर बंधाऱ्यावर तीन दिवसांपासुन शोध मोहिम सुरू आहे. पीडित बहिणीच्या तक्रारीवरून राजगुरूनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नराधम आरोपीही अटक करण्यात आली आहे. मात्र पीडित तरुणी अत्याचार झाल्यानंतर तीन दिवसापासून बेपत्ता आहे. यामुळे कुटुंबीयांची चिंता अजून वाढली आहे.
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण; पोलिसांची भूमिकाही संशयाच्या भोवऱ्यात
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात पुणे पोलिसांची भूमिका आता संशयाच्या छायेत आली आहे. हगवणे कुटुंबाविरोधात त्यांच्या सुनांकडून वारंवार तक्रारी करण्यात आल्या होत्या, पण पोलिसांनी त्या तक्रारी गांभीर्याने घेतल्या नाहीत. वैष्णवीच्या अर्भकाचे अपहरण झाल्यानंतरही पोलिसांनी दुर्लक्ष करत गंभीर निष्काळजीपणा केला. परिणामी, हगवणे कुटुंबातील काही संशयित व्यक्तींना अप्रत्यक्षपणे संरक्षण दिल्याचा आरोप पोलिसांवर ठेवला जात आहे. या पार्श्वभूमीवर, या प्रकरणात निष्क्रिय राहिलेल्या पोलिस अधिकाऱ्यांवर सरकार कोणती कारवाई करणार, हा प्रश्न आता समाजामध्ये विचारला जात आहे. सविस्तर बातमी…
Vaishnavi Hagavane Case: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण; पोलिसांची भूमिकाही संशयाच्या भोवऱ्यात