डॉक्टरचा तरुणीवर बलात्कार (Photo : Molestation)
उमरखेड : घरासमोर भांडी घासत असताना एकाने वाईट हेतूने महिलेचा हात पकडला. त्यानंतर महिलेला पकडून ओढण्यात आले. त्यावेळी संबंधित महिलेने आरडाओरड केल्यानंतर आरोपी पळून गेला. या पीडित विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरून दराटी पोलिसांनी आरोपी सुखदेव गणपत राठोड (वय 40) याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा केला आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 6) रात्री घडली आहे.
हेदेखील वाचा : पतिसमोरच सासरा करायचा सुनेवर लैंगिक अत्याचार; पिंपरी-चिंचवडमधील संतापजनक प्रकार
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा पीडित विवाहितेवर शेतात जाताना नेहमी पाळत ठेऊन एकटी असताना ‘तू मला आवडतेस’, असे म्हणून पाठलाग करत होता. त्याला वारंवार समजावून सांगितले तरी तो ऐकत नव्हता. यामुळे आपली बदनामी होऊ नये म्हणून विवाहितेने हा प्रकार तिचे पती व सासू, सासरे यांना सांगितला नाही.
दरम्यान, शुक्रवारी (दि. 6) रात्री जेवण आटोपल्यानंतर पती व मुले झोपण्याच्या तयारीत घरात असताना पीडित विवाहिता आपल्या घरासमोरील अंगणात भांडी घासत होती. आरोपी सुखदेव तेथे आला व वाईट हेतूने महिलेचा हात पकडून जबरदस्तीने अंधारात चल असे म्हणू लागला.
महिलेने आरडाओरड केली अन्…
त्यादरम्यान महिलेने आडाओरड करून आपल्या पतीला आवाज दिला. तेव्हा पतीसह आरडाओरड ऐकून शेजारी तेथे आले असता, आरोपी पळून गेला, अशी तक्रार पीडितेने दराटी पोलिस स्टेशनला दिली. या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे.
अंबरनाथमध्ये लैंगिक अत्याचाराची घटना
अंबरनाथ पश्चिमेतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खाजगी संस्थेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या ३ अल्पवयीन विद्यार्थ्यांसोबत शिक्षकाने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विद्यार्थी शाळेत जात नसल्याने खेळाचं प्रशिक्षण देणाऱ्या शिक्षकाने विद्यार्थ्यांकडे विचारपूस केली, त्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी नराधम शिक्षकाविरोधात अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
पिंपरी-चिंचवडमध्येही अत्याचाराची घटना
तर पिंपरी-चिंचवडमध्येही अत्याचाराची घटना समोर आली आहे. पतीसमोर पतीच्या संमतीने सासरा सुनेवर लैंगिक अत्याचार करत असल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी येथे उघडकीस आला आहे. सुनेच्या नावाने डेटिंग साईटवर बनावट प्रोफाईल बनवून तिला वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडल्याचेही उघडकीस आले आहे. यासाठी विवाहितेने विरोध केला असता तिला मुलांसह घराबाहेर काढण्यात आले.
हे सुद्धा वाचा : पुण्यात चाललंय काय? व्हाट्सअॅपवर डीपी ठेवल्याने तरुणावर कोयत्याने सपासप वार