अंडरवर्ल्ड डॉन अरूण गवळीची तुरूंगातून सुटका; 'या' प्रकरणात भोगली १८ वर्षांची शिक्षा
अरुण गवळी २००४ मध्ये मुंबई विधानसभा मतदारसंघातून आमदारही झाले. २०१२ मध्ये मुंबई सत्र न्यायालयाने २००७ मध्ये मुंबई शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येप्रकरणी गवळीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. नंतर त्यांना नागपूर तुरुंगात पाठवण्यात आले. न्यायालयाने त्यांना १७ लाख रुपयांचा दंडही ठोठावला.
न्यायाधीश एमएम सुंदरेश आणि न्यायमूर्ती एन कोटिश्वर सिंह यांच्या खंडपीठाने गवळीच्या जामीन अर्जावर सुनावणी करताना त्याचा दीर्घ तुरुंगवास आणि त्याचे वय विचारात घेतले. त्यानंतर, न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाने ठरवलेल्या अटी आणि शर्तींच्या अधीन राहून गवळीला जामीन मंजूर केला. गेल्या १८ वर्षांपासून तो जामिनासाठी प्रयत्न करत होता.
न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश आणि न्यायमूर्ती कोटिश्वर सिंह यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. दीर्घकाळ तुरुंगवास भोगल्यामुळे त्यांची सुटका करण्यात येत असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. या खटल्यात गवळी यांची बाजू अॅड. शंतनु आडकर यांनी मांडली. कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येच्या प्रकरणात अरुण गवळी यांना अटक झाली होती. त्यावेळी ते आमदार होते. त्यानंतर या प्रकरणात त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. एका राजकीय नेत्याच्या खूनप्रकरणी आमदाराला झालेली ही शिक्षा त्यावेळी मोठ्या चर्चेचा विषय ठरली होती.
दिल्लीच्या अनेक भागात पूर परिस्थिती; यमुना नदीने ओलांडली धोक्याची पातळी, जनजीवन विस्कळीत
२ मार्च २००७ रोजी सायंकाळी घाटकोपर येथील असल्फा व्हिलेजमधील रुमानी मंझील चाळीत राहत्या घरात टीव्ही पाहत असताना शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात मुंबईतील सत्र न्यायालयाने अरुण गवळी आणि इतर ११ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मात्र, सहआरोपी सुरेश पांचाळ, दिनेश नारकर आणि गणेश साळवी यांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली होती.
मुंबई महापालिका निवडणुकीत कमलाकर जामसंडेकर यांनी अरुण गवळी यांच्या अखिल भारतीय सेना पक्षाचे उमेदवार अजित राणे यांचा अवघ्या ३६७ मतांनी पराभव केला होता. या पार्श्वभूमीवरच काही महिन्यांतच जामसंडेकर यांची हत्या झाल्याने मोठी खळबळ उडाली होती. त्या वेळी गवळी आमदार होते. एखाद्या राजकीय नेत्याच्या खून प्रकरणी आमदाराला झालेली जन्मठेप ही त्यावेळी चर्चेचा विषय ठरली होती.






