आंजी येथे अल्पवयीन मुलावर अत्याचाराचा प्रयत्न; नराधमानं रुममध्ये बोलावलं (crime (फोटो सौजन्य : social media)
रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. पैश्यासाठी एका महिलेने आपल्या पोटच्या पाच वर्षाच्या मुलाला आईने विकल्याचे खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणानंतर सर्वत्र संतप्त भावना व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना २६ जून २०२५ रोजी दुपारी १२.३० वाजता गुहागर एस.टी. स्टैंड परिसरात घडल्याचे सांगण्यात येत आहे.
Beed Crime: केस मागे का घेत नाही? म्हणत महिलेवर कोयत्याने जीवघेणा हल्ला; चार जण जखमी…
पोलिसांनी या प्रकरणात दोघांना अटक केली आहे. आरोपी अरबिना सुफियान पांजरी (वय २४) रा. हर्णे बाजारमोहल्ला हिने आपल्या ५ वर्षाचा मुलगा अरहान सुफियान पांजरी यास पैशासाठी सत्यवान दत्ताराम पालशेतकर (वय ५२) रा. बोऱ्या कारुळ, ता. गुहागर, जि. रत्नागिरी याला विकले. मात्र या प्रकरणाची गंभीर दाखल घेत दापोली पोलिसांनी दोघांविरुद्ध ‘बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५’ अंतर्गत गुन्हा दाखल करत त्या दोघांना अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हिरेमठ करीत आहेत.
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा बस्थानकात गोळीबार ; तरुणाचा मृत्यू
जळगाव जिल्ह्यात पाचोरा येथे बस्थानकात परिसरात शुक्रवारी दुचाकीवर आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला.
आकाश मोरे (३२, रा. छत्रपती शिवाजीनगर, पाचोरा) असे मृत तरुणाचे नाव आहे. हा तरुण त्याच्या नातेवाईकांना सोडण्यासाठी पाचोरा बसस्थानकावर शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास आला होता. त्याच वेळी भरधाव दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर १२ गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात आकाशच जागीच मृत्यू झाला.
गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पाचोरा पोलिसांनी तातडीने धाव घेतली.घटनेनंतर पाचोरा पोलिसांनी हल्लेखोराचा शोध घेण्यासाठी तातडीने पथके रवाना केली आहेत न्यायवैद्यक पथकाने पंचनामा पूर्ण केल्यानंतर मृतदेह ग्रामीण गुन्हाळयात रवाना केला. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, चोपड्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनीही येथे भेट देऊन कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. तसेच पुढील तपासाला गती देण्याचे निर्देश यंत्रणेला दिले. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.