काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, सिराज नाईक हा अनेक दिवसांपासून आपल्या पत्नी मुमताजवर चारित्र्याचा संशय घेत होता. तिचे इतर पुरुषांसोबत संबंध असल्याचा आरोप करून तो सतत तिच्याशी वाद घालत असे. यामुळे त्यांच्या घरात नेहमीच तणावाचे वातावरण निर्माण होत होते. बुधवारी रात्री उशिरा, अंदाजे अडीचच्या सुमारास, दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. संशयाचा मुद्दा पुन्हा समोर आल्यानंतर सिराजचा राग अनावर झाला आणि त्याने हाताशी आलेल्या दगडाने मुमताजवर वार करत तिला ठेचून ठेचून ठार मारले.
Nanded Crime: संतापजनक! 7 वर्षीय चिमुकलीवर शिक्षकाकडून अत्याचार; आरोपी अटकेत
घटनानंतर पतीचे धक्कादायक पाऊल
पत्नीची हत्या केल्यानंतर पतीने पळून जाण्याचा किंवा पुरावा लपवण्याचा प्रयत्न केलेला नाही. उलट सकाळी तो थेट मालवणी पोलीस ठाण्यात गेला आणि पोलिसांना शांतपणे संपूर्ण घटना सांगत हत्येची कबुली दिली. पोलिसांनी तत्काळ पथक घटनास्थळी रवाना केले. तेथे मुमताज गंभीर अवस्थेत आढळली. तिला तात्काळ शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
पोलिसांचा तपास
मालवणी पोलिसांनी सिराज नाईक याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलमान्वये खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून सखोल तपास सुरू आहे. परिसरात या घटनेमुळे संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांनीही अशा प्रकारच्या वाढत्या कौटुंबिक हिंसाचाराविरोधात कडक कारवाईची मागणी केली आहे.
Akola Crime: अकोला हादरलं! शेतात अज्ञात युवतीचा जळालेला मृतदेह आढळला; हत्या की काही वेगळं?
Ans: संशय
Ans: सरेंडर
Ans: अटक






