विशाल अग्रवालचा जामिन अर्ज फेटाळला (फोटो- सोशल मीडिया)
पोर्शे अपघात प्रकरणात विशाल अग्रवाल १७ महिन्यांपासून तुरुंगात
ससून रुग्णालयातील दोन डॉक्टराना झाली होती अटक
पोर्शे अपघातामध्ये झाला होता दोन जणांचा मृत्यू
पुणे: पुणे शहरात गेल्या वर्षी कल्याणीनगर येथे एका भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनाने दोन जणांना उडवले होते. यामध्ये तरुणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात एका धनवान व्यक्तीच्या मुलाने दारूच्या नशेत अपघात केल्याचे समोर आले. पोर्शे अपघात प्रकरणात त्या मुलाचे वडील विशाल अग्रवाल याला अटक करण्यात आली होती. दरम्यान त्याने जामिन मिळण्यासाठी हायकोर्टात अर्ज दाखल केला होता. दरम्यान हायकोर्टाने विशाल अग्रवालला दणका दिला असून त्याचा जामिन अर्ज (Crime) फेटाळून लावला आहे.
पुण्याच्या कल्याणीनगर परिसरात घडलेला पोर्शे कार अपघात संपूर्ण राज्यात चर्चेत आले होते. एका अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत दोन जणांना उडवले होते. त्यात त्यांचा मृत्यू झाला होता. दरम्यान मुलाला वाचवण्यासाठी विशाल अग्रवालने मुलाच्या वैद्यकीय अहवालात छेडछाड केल्याचे समोर आले होते. त्यामुळे त्याला अटक देखील करण्यात आली.
दरम्यान या प्रकरणात विशाल अग्रवालने हायकोर्टात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. दरम्यान हायकोर्टाने विशाल अग्रवालचा जामिन फेटाळला आहे. गेल्या १७ महिन्यांपासून विशाल अग्रवाल तुरुंगात शिक्षा भोगत आहे. दरम्यान हायकोर्टाने जामिन फेटाळला असल्याने त्याचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे.






