मुंबईत एक धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे. गुरुवारी सायंकाळी एका महिला वैमानिकांसोबत चालत्या कॅबमध्ये अतिप्रसंगाचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चालकाने रास्ता बदलून गाडीत दोन अज्ञात व्यक्तींना बसवलं आणि त्या दोघांनी महिलेवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांची नाकाबंदी पाहून आरोपी पळून गेले. ही घटना मुंबईतील घाटकोपर परिसरात घडली आहे. याप्रकरणी घाटकोपर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून तपास सुरु आहे.
खळबळजनक ! बापानेच केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार; हात-पाय दाबायला सांगत चुंबन घेतलं अन्…
काय घडलं नेमकं?
महिला वैमानिकेने फोर्ट परिसरातून घरी जाण्यासाठी एक कॅब बुक केली. अर्धा प्रवास झाल्यानंतर कॅब चालकाची नियत बदलली. त्याने अचानक रस्ता बदलला, ज्यामुळे महिलेला संशय आला. थोड्याच अंतरावर चालकाने गाडी थांबवली आणि कॅबमध्ये दोन अज्ञात पुरुष बसले. हे पाहून महिला अधिकच घाबरली. त्यानंतर त्या दोघांनी महिलेला धमकावत तिच्यासोबत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, काही अंतरावर पोलिसांची नाकाबंदी दिसल्याने चालकाने घाईघाईने गाडी थांबवली. हे पाहून दोघे आरोपी कॅबमधून उतरून पळून गेले. त्या दोघांकडे कॅब चालकाकडे चौकशी केली असता, त्याने असमाधानकारक उत्तर दिली. घाबरलेल्या महिलेने लगेच आपल्या पतीला फोन करून संपूर्ण माहिती दिली. नंतर दोघांनी घाटकोपर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली. पिडीत महिला आपल्या पतीला भेटण्यासाठी सीएसएमटी परिसरात आली होती. भेटीनंतर तिने फोर्ट परिसरातून आपल्या घरी जाण्यासाठी एक कॅब बुक केली होती.
HIT AND RUN: मद्यधुंद तरुणाच्या भरधाव कारची धडक, महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू
जळगावमध्ये हिट अँड रनचा थरार समोर आला आहे. यात दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला आहे. ही घटना महाबळ परिसरात घडली आहे. भरधाव कारणे एका महिलेला धडक दिल्याची घटना गुरुवारी रात्री घडली आहे. या दुर्घटनेत जखमी अवस्थेत महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला. महिलेच्या कुटुंबीयांनी दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपीविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. या दुर्घटनेत मृत झालेल्या महिलेचे नाव वंदना सुनील गुजराथी आहे. त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. अपघातस्थळावरून स्थानिकांना मध्यधुंद अवस्थेत कारचालक तरुणाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मद्यधुंद आरोपीला रात्रीच बेड्या ठोकल्या आहेत.पोलिसांच्या ताब्यात असलेल्या मोटू शिवपाल सैनी या तरुणाविरुद्ध रामानंद पोलीस स्टेशनमध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या दुर्घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगाने तरुणाने काही वाहनांनाही धडक दिल्याचे व्हिडिओतून दिसून आले आहे.
भिवंडी ठाणे बायपास रोडवर भीषण आघात; दोन दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू;