मुंबईच्या मीरारोड कनकिया येथून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. म्हाडा वसाहतीत एका महिलेची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हत्या झालेल्या महिलेचं नाव करिश्मा असे आहे. तिच्या गळ्यावर धारधार शस्त्राने खोल वार करून हत्या करण्यात आली. ही हत्या तिच्याच प्रियकराने केली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. हत्या झालेल्या महिलेचं नाव करिश्मा (पूर्ण नाव गोपनीय) तर आरोपीचा नाव शमशुद्दीन मोहम्मद खुर्शीद हसीफ (वय 24, व्यवसाय,शेफ) असे आहे.
किरकोळ वाद आणि माजी नगरसेविकेच्या समर्थकांकडून तरुणावर तलवारीने हल्ला; अंबरनाथ हादरलं!
काय घडलं नेमकं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करिश्मा आणि शमशुद्दीन यांच्यात प्रेम संबंध होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या नात्यात दुरावा व वाद वाढू लागले होते. प्राथमिक माहितीनुसार समोर आले आहे की, नात्यातील ताणामुळे आरोपीने रंगाच्या भारत त्याने हे हत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी पोहोचले. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी तपासणी केली असून, संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. ही हत्या अत्यंत निर्घृण आणि अमानुष पद्धतीने करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, करिष्मा आणि तिचे दोघे भाऊ व प्रियकर समशुद्दीन मोहम्मद हाफीज यांच्यासह मीरा रॉड येथे राहत होती. समशुद्दीन हा एका हॉटेलमध्ये शेफ म्हणून काम करत होता. गेल्या एक वर्षांपासून दोघे रेलशनशिपमध्ये होते. समशुद्दीनने लग्न करण्यासाठी करिश्माकडे तगादा लावला होता, परंतु आधी थोडे पैसे कमवू व नंतर लग्न करू, असे ती त्याला सांगत होती. गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये सातत्याने भांडण होत होती.
गुरुवारी देखील सोघांमध्ये भांडण झाले. रागाच्या भरामध्ये तो गावी जात असल्याचे सांगितले व तो घरातून निघून गेला. मात्र रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास तो पुन्हा घरी परतला आणि त्यावेळी ती घरात गळा चिरलेल्या अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसून आली. तिच्या भावांनी समशुद्दीनला फोन केला, पण त्याने फोन उचलला नाही. त्यादिवशी समशुद्दीनने तिचे दुसऱ्या कोणासोबत प्रेमसंबंध सुरू असल्याचा संशय व्यक्त केला. या संपूर्ण प्रकरणाचा अवघ्या चार तासांत छडा लावत मिरारोड पोलीस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक मेघना बुरांडे व त्यांच्या पथकाने अत्यंत कौशल्याने तपास करत आरोपी शमशुद्दीनला अटक केली.