बंगळुरूच्या उत्तराहल्ली परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणीने तिच्या प्रियकरासोबत मिळून आपल्या आईची हत्या केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. एवढेच नाही तर, ही हत्या आत्महत्या दाखवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या तपासात ही धक्कदायक माहिती उघडकीस आली आहे.
Akola News: उरळ पोलिसांचा ‘दणका’! एकाच दिवशी पाच दारू विक्रेत्यांवर धाड; लाखोंचा मुद्देमाल जप्त
नेमकं प्रकरण काय आहे?
मृतक महिला ही लोन रिकव्हरी कंपनीमध्ये हेल्पर म्हणून काम करत होती. ती तिच्या पतीपासून वेगळी आपल्या मुलीसोबत एकटीच राहायची. मृतक महिलेचं नाव नेत्रावती असल्याची माहिती आहे. मृतकाची मुलगी ही १७ वर्षाची असून १० वी नापास आहे. तिचं तिच्या मावशीच्या मुलाच्या मित्रावर प्रेम होतं. मावशीच्या मुलाचा मित्र असल्याने तिच्या प्रियकराचं तिच्या घरी सतत येणं-जाणं असायचं.
आईचा प्रेमाला विरोध
नेत्रावतील तिच्या मुलीच्या अफेरारबद्दल माहिती झालं. तिने याला विरोध केला. त्याने तिच्या मुलीच्या प्रियकराला सुद्धा घरात येण्यापासून रोखलं. जर त्याने पुन्हा मुलीशी बोलण्याचा प्रयत्न केला तर पोलिसांना बोलावण्याची धमकी सुद्धा तिने दिली.
आईचा काटा काढण्याचा रचला कट
या आईच्या विरोधामुळे मुलगी आणि तिचा प्रियकर संतापले. २४ ऑक्टोबरला संबंधित मुलगी एका मॉलमध्ये तिच्या प्रियकराला आणि मित्रांना भेटण्यासाठी बोलावलं. त्यावेळी, आरोपी मुलीने तिच्या आईचा काटा काढण्याचा कट रचला. आपली आई रात्री दारू पियुन लवकर झोपून जाते. त्यामुळे त्यावेळी घरी जाणं सोपं असल्याचे तिने तिच्या साथीदारांना सांगितले.
कशी केली हत्या?
२५ ऑक्टोबर रोजी रात्री 9 वाजताच्या सुमारास, आरोपी तरुणी प्रियकर, तीन मित्र आणि १३ वर्षांच्या चुलत भावासोबत घरी पोहोचली. नेत्रावतीने त्यांना सर्वांना पाहिलं आणि रागाच्या भरात तिच्या प्रियकराचा मोबाईल फोन हिसकावून घेतला. तिने पोलिसांना फोन कर्णयची धमकी सुद्धा दिली. तेव्हा आरोपींनी त्या महिलेला पकडलं आणि टॉवेलने तिचा गळा दाबून हत्या केली. हत्येनंतर, आरोपींनी ती आत्महत्या दाखवण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी खोलीत जाऊन नेत्रावतीचा मृतदेह पंख्याला लटकवला आणि दरवाजा बंद केला. त्यानंतर, ती मुलगी तिच्या प्रियकरासोबत तिथून पळून गेली.
आत्महत्या केल्याच सर्वांना वाटलं पण…
दुसऱ्या दिवशी. नेत्रावतीचा पार्टनर तिच्या घरी गेला. तेव्हा त्याला घराचा दरवाजा बंद दिसला. त्यावेळी त्याला ती बाहेर गेली असेल असं वाटलं. सोमवारी त्याने खिडकीतून पाहिलं तेव्हा तिचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला. यावरून महिलेने आत्महत्या केल्याचा सर्वांनी अंदाज बांधला. नेत्रावतीची मुलगी अचानक बेपत्ता झाल्याने वेगळाच संशय निर्माण झाला. 29 ऑक्टोबर रोजी मृत महिलेच्या बहिणीने या घटनेसंबंधी पोलिसात तक्रार दाखल केली. चौकशीदरम्यान, आरोपी मुलीने तिचा गुन्हा कबूल केला. पोलिसांनी या प्रकरणी चार अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरू आहे.
तासगावात अमली पदार्थविरोधात मोठी कारवाई, एकाला अटक; लाखोंचा मुद्देमाल जप्त






