‘पिंक गँग’ ही एक मुलींची टोळी आहे. या १६ मुलींना फोन कॉलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील मुलांना आपल्या जाळ्यात ओढत लाखो रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या मुलीना अटक केली असून त्यांच्या सोबत दोन पुरुषांना देखील अटक करण्यात आली आहे. ही घटना उत्तर प्रदेशच्या पश्चिमेकडे असणाऱ्या मुजफ्फरनगर इथे मंगळवारी समोर आली. पोलिसांनी धाड टाकत ही कारवाई केली आहे.
शोरूममध्ये घुसून कामगारानेच केली चोरी; सुरक्षा रक्षकाचे हात- पाय बांधले अन्…
बेरोजगार तरुणांना निशाण्यावर घेत, त्यांना नोकरीच आमिष दाखवून या मुली त्यांना आपल्या जाळ्यात ओढायच्या. त्यानंतर त्याच मुलांची फसवणूक करून त्यांच्याकडून लाखो रुपयांची लूट करत होते.
नेमकं काय घडलं?
आपात्कालीन दूरध्वनी क्रमांकावर पोलिसांना या कॉलटसेंटरसंदर्भातील माहिती मिळाली आणि तातडीनं त्यांनी धाड टाकण्यासाठीच्या हालचाली सुरू केल्या. ज्यानंतर पोलिसांना घटनास्थळाहून मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक उपकरणं सापडली. दरम्यान याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या मुलींसोबतच दोन पुरुषांनासुद्धा पोलिसांनी बेड्या ठोकल्या. अटक केलेल्या पुरुषांचं नाव आहद आणि जुबैद असे आहे. मुलींच्या टोळक्यामागे या दोघांचच डोकं असल्याची माहिती समोर येत आहे. मुलांची फसवणूक करण्यासाठी मुलींना पगारही दिला जात होता. बेरोजगार तरुणांना फोन करणं आणि त्यांना तगड्या पगाराच्या नोकरीचं आमिष दाखवत या जाळ्या अडकवणं हेच काम या मुली तरत होत्या. पोलिसांना जेव्हा या संपूर्ण घटनेचा सुगावा लागला तेव्हा त्यांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाड टाकली असता तिथून 16 मुलींना अटक करण्यात आली.
कसे करत होते फसवणूक?
बेरोजगार तरुणांचा दूरध्वनी क्रमांक मिळाल्यानंतर त्यांच्याशी संपर्क साधत या तरुणी त्यांच्यापुढं आकर्षक पगाराच्या नोकरीचा प्रस्ताव ठेवत आणि त्यानंतर ‘सिक्योरिटी मनी’ म्हणजेच Advance रक्कम मागत. ही रक्कम साधारण 2500 ते 5000 रुपयांच्या किंवा त्याहून अधिकही असे. ही रक्कम मिळताच नोकरीबाबतचा चकार शब्दसुद्धा काढला जात नसे. कोणतीही तक्रार करण्यासाठी तरुणांनी याच क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन लागत नसे. कारण या मुलींकडून तरुणांचे मोबाईल क्रमांक ब्लॉक केले जात.
मुजफ्फरनगरचे एसपी सिटी सत्यनारायण प्रजापत यांनी दिलेल्या माहितीसंदर्भात 1930 या पोलीस हेल्पलाईन क्रमांकावर आलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली. त्या ठिकाणाहून धाडसत्रामध्ये 20 मोबाईल, 30 सिमकार्ड, महत्त्वाचे कागदपत्र आणि काही नोंदी सापडल्या. तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार पुणे आणि महाराष्ट्रातील बहुतांश भागांतील तरुणांना या पिंक गँगनं आपल्या जाळ्यात खेचलं होतं. जिथं दर महिन्याला 30 ते 40 हजार फोन कॉल केले जात आणि या माध्यमातून असंख्य तरुणांची फसवणूक करण्यात आली होती. सध्या पोलीस या प्रकरणाची पाळंमुळं नेमकी कुठवर गेली आहेत, याचाच शोध घेत आहेत.