राज्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. आता नाशिकच्या शिवाजीनगर परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक २० वर्षीय तरुणाला धारधार शाश्त्राने वार करत खून करण्यात आला आहे. हत्या झालेल्या तरुणाचे नाव नसीम अकबर अली शहा ( २०. रा. गुरुद्वारा रोड, म्हशीचा तबेला, सातपूर) असे आहे. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात ही हत्या झाल्याची समोर आली आहे.
‘माझं लग्न झालंय, पत्नीला माझ्यासोबत पाठवा’, असं म्हणताच दोघांनी तरुणाला…
नसीम अकबर अली शहा याच्यावर अज्ञात व्यक्तींनी गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवाजीनगर परिसरात धारधार शास्त्राने वर केले. यानंतर नासिमला तात्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. गंगापूर पोलिसांनी या प्रकरणी पुन्हा दाखल केला आहे.
या हत्येचा नेमकं कारण काय? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही आहे. ही हत्या प्रेमप्रकरणातून किंवा मुलीच्या छेडछाडीच्या वादातून झाल्याचा प्राथमिक तपासात अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. सध्या अज्ञात आरोपीविरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरु आहे.
गेल्या काही दिवसामध्ये नाशिकमधील गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. नाशिकमधील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस काय उपाययोजना राबवणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीच आणि असुरक्षिततेचं वातावरण निर्माण झालं आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
वैष्णवीच्या आत्महत्येप्रकरणी मोठी अपडेट; अंगावर मारहाणीचे तब्बल 29 व्रण, 5-6 जखमा तर…