Navi Mumbai Crime Ex Bjp Corporator Consumes Poison At Police Station
Navi Mumbai News : वाल्मिक कराडचं नाव घेत अन्…, भाजपच्या माजी नगरसेवकाने पोलीस ठाण्यातच केलं विष प्राशन
Navi Mumbai Crime: राज्यात संतोष देशमुख हत्याकांडावरून रान उठले असता भाजपच्या एका माजी नगरसेवकाने पोलीस ठाण्यातच विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.नेमकं काय आहे प्रकरण जाणून
भाजपच्या माजी नगरसेवकाने पोलीस ठाण्यातच केलं विष प्राशन
(फोटो सौजन्य-X)
Follow Us:
Follow Us:
Navi Mumbai Crime News Marathi: नवी मुंबई जिल्ह्यातील एका माजी भाजप नगरसेवकाने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, नवी मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकाला पोलिस ठाण्यात विष प्राशन केले.भरत जाधव असे या नगरसेवकाचे नाव असून रायगड जिल्ह्यातील कर्जत पोलीस ठाण्यात हा प्रकार घडला. भरत जाधव यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ते विष पिताना दिसत आहेत. हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. मात्र नेमक्या कोणत्या प्रकरणामुळे नगरसेवक भरत जाधव यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला हे अद्याप समजू शकले नाही. . विष प्राशन केल्यानंतर भरत जाधव यांना त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांना तातडीने नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आल. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. ही घटना नेमकी कशामळे घडली,याचा तपशील अद्याप समोर आला नाही.
आज मी प्रचंड मानसिक ताणतणावात आहे, कारण समाजामध्ये वाल्मिक कराडच्या सारखी प्रवृत्ती समाजात इतकी प्रचलित झाली आहे की तुम्ही प्रामाणिकपणे काम करू शकणार नाही. मी माझा व्यवसाय प्रामाणिकपणे करत आहे, पण त्यामध्ये मला त्रास झाला. २५ वर्षांच्या राजकारणात इतर राजकारण्यांप्रमाणे मी चुकीच्या पद्धतींनी पैसे कमवले, असे कोणीही सांगून दाखवावे….चार-पाच वर्षांपूर्वी कर्जत-जामखेड तालुक्यात बांधकाम सुरू केलं.. रमेश आसबे, युनूस सय्यद, बेबीचंद धनावडे आणि मी. रमेश असबेच आणि सचिन घायवाल आणि नीलेश घायवाल यांच्यात काय वाद झाला मला नाही माहिती, गेल्या तीन वर्षांपासून दहशतीमुळे त्या इमारतीचे काम थांबले आहे. नीलेश घायवाल आणि सचिन घायवाल यांच्या दोन-तीन गाड्या ३०-४० फूट अंतरावर घटनास्थळी गेल्या. या इमारतीसाठी एकही बुकिंग नाही. आज सुमारे तीन ते चार कोटी उद्योजक बँक कर्जामुळे तोटा सहन करत आहेत. मला ते सहन होत नाहीये, अशा गोष्टी घडत आहेत. बँकेचे कर्ज आणि व्याज सुरू झाले आहे. जामखेडच्या भूम तालुक्यात एक प्लांट आहे. हे लोक आपल्याला त्रास देतील, हे मला माहिती आहे, म्हणून मी तिकडे काम सुरु केले. मुन्नाभाई आणि संदीप एकाच व्यवसायात आले आणि त्यांना भागीदार म्हणून घेतले. त्यांनी बारा महिन्यांत ९० लाख रुपये कमावले आणि ६० लाख रुपयांचा नफा कमावला. पाच-दहा लाखांवरुन भांडणं, मारामाऱ्या केल्या, माझ्या दुसऱ्या पार्टनरला मारहाण केली. मी म्हणालो, देऊन टाका, भांडण नको. त्यानंतर जीएसीटीची बिलं देताना त्यांनी बोगस बिलं दिली. त्यामुळे आमच्या कंपनीला त्रास सहन करावा लागत आहे, आमची काहीही चूक नसताना.
नरेंद्र झुरानी प्रकरणही असेच आहे, हे प्रकरण खूप विचित्र आहे. मी नवी मुंबईत ज्याला लहानाचा मोठा केला, ज्याला नावारुपाला आणला, ज्याला समाजात वावरायचं शिकवलं, कामं घेऊन दिली, पैसे दिले. त्याचा हिशेब करताना एका राजकीय नेत्याच्या, कधी दुसऱ्याच्या आश्रयाला जायचं. या नरेंद्र झुरानियला दत्ता घंगाळे यांना भाजप युवा मोर्चाच्या जिल्हा सचिवांनी ५ लाख रुपये देऊन पाठवले आहे, त्यांच्याशी कोणताही संबंध प्रस्थापित झालेला नाही. त्याने त्याला शाही पाठबळ दिले आणि तो व्यवसाय भागीदार बनला. त्याच्या व्यवसायाबद्दल कोणतीही माहिती नाही पण कोटींची जमीन विकसित केली जात आहे. दत्ता घंगाळे यांनी मला गँगवॉरची धमकी दिली. नरेंद्र झुरानी मला फसवत आहे, हे त्यांच्या कुटुंबाबद्दलची ही माहिती आहे. दत्ता घंगाळे यांच्या मुलाने माझी कॉलर धरली आणि मला धमकी दिली. ते माझी बदनामी करतात, मला लक्ष्य करतात, विशाल डोळस, अभिलाष मॅथ्यू, सचिन शिंदे, अनिकेत हे मला भररस्त्यात शिव्या देतात, त्रास देतात. मी भरस्वत्यम आहे, शिवाजी मला त्रास देत आहे, मला दहशत देत आहे. मी कधीही कोणत्याही आर्थिक बाबींमध्ये अडकलो नाही. नरेंद्र झुराणी यांनी केलेल्या कामाची आणि प्रभाग क्रमांक १०८ मध्ये केलेल्या कामाची सरकारने चौकशी केली आहे. कर्जत-जामखेड तालुक्यात कोट्यवधी रुपयांची जमीन संपादित करण्यात आली. यामध्ये अनेक कमिशन समाविष्ट आहेत. दत्ता पवार, रुपेश पवार यांनी झाडाचे आणि रस्ता काढून देण्याचे पाच-सात लाख रुपये घेतले. आता माझ्याच जमिनीला जाणारा रस्ता खोदून टाकला. जेणेकरुन मला जमीन विकता येऊ नये, असे भरत जाद यांनी व्हिडीओत म्हटले आहे.