नवी मुंबई : दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालताना पोलीस यंत्रणसमोर कायमच आव्हानं येत आहे. नवी मुंबईतील कोपरखैरणे सेक्टर 19 मध्ये रात्रीच्या सुमारास, जुन्यावादाच्या रागातून दोन गटांनी एकमेकांवर तलवार व कोयत्याने वार केल्याची घटना घडली आहे. सदर घटनेत कोपरखैरणे पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे. तर एका फरार आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत.
जुन्या वादाच्या रागातून चार जणांनी दोघांवर वार केल्याची घटना घडली आहे. त्यापैकी चौघे रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती मिळत आहे. कोपरखैरणे सेक्टर 19 मधील एकविरा वॉशिंग सेंटरच्या मागील बाजूस, चौघाजणांनी तलवार व कोयत्याने एकावर वार केल्याची घटना घडली आहे. राजेश जेजुरकर याच्यावर हर्षल भोसले, गोरख म्हात्रे, राज विद्यासागर, व इरफान शेख या चौघांनी धारदार कोयता व तलवारीने वारकऱ्याची घटना घडली आहे. जुन्यावादाच्या रागातून चौघांनी रात्रीच्या सुमारास राजेश जेजुरकर वर वार केले. आकाश नवघणे हा राजेश याला वाचण्यासाठी आला असता, आकाश वर देखील वार करण्यात आले. या वादात हर्षद भोसले, गोरख म्हात्रे, राज विद्यासागर व इरफान शेख हे चार जण जखमी झाले आहेत.
हर्षद भोसले, गोरख म्हात्रे, राजेश जेजुरकर व आकाश नवघरे हे रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगार असून, यांच्यावर मालमत्ता चोरी तसेच शारीरिक दुखापत केल्याबाबत गुन्हे दाखल असल्याची माहिती तपासात निष्पन्न झाली आहे. पोलिसांनी हर्षल भोसले, गोरख म्हात्रे, राज विद्यासागर, राजेश जेजुरकर, आकाश नवघणे या चौघांना अटक केली आहे तर इरफान शेख हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. हल्ल्यात वापरलेले हत्यार कोयता व तलवार पोलिसांनी जप्त केल्या असून, अटक आरोपींवर आयपीसी कलम 307, 324 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्हीही बाजूने एकमेकांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. हल्ल्यामागील जुन्या वादाच्या कारणाचा तपास पोलीस करत आहेत. तसेच फरार आरोपी इरफान शेख याचा देखील शोध कोपरखैरणे पोलीस घेत आहेत.