Photo Credit- Social Media (लॉरेन्स बिश्नोई गॅंगला घेरण्याची तयारी सुरू)
मुंबई: राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) लॉरेन्स बिश्नोई गँगच्या मुसक्या आवळण्याची तयारी सुरू केली आहे. एनआयएने लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईवर 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. अनमोल बिश्नोई लॉरेन्सपचा भाऊ आहे. त्याने गायक आणि राजकारणी सिद्धू मुसेवाला यांच्या हत्या प्रकरणातील तो मुख्य आरोपींपैकी एक आहे. 2023 मध्ये तपास यंत्रणेने त्याच्याविरूद्ध आरोपपत्रही दाखल केले आहे. एका अहवालानुसार तो बनावट पासपोर्टच्या आधारे भारतातून पळून गेला आहेय.
मिळालेल्या माहितीनुसार,अनमोल बिश्नोईवर 18 गुन्हे दाखल आहेत. तोही काही महिने तुरूंगात होता. 7 ऑक्टोबर 2021 रोजी अनमोलची जामिनावर सुटका झाली. पण त्यानंतर तो फरार आहे. अनमोल बिश्नोई आपली लोकेशन्स बदलत राहतो आणि गेल्या वर्षी केनिया आणि या वर्षी कॅनडामध्ये दिसला होता.
हेही वाचा: Assembly Election 2024 | “बनसोडेंना उमेदवारी दिल्यास
14 एप्रिल 2024 रोजी सुपरस्टार सलमान खानच्या घराच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर गोळीबार करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या मुंबई गुन्हे शाखेने गोळीबार प्रकरणातील आरोपी अनमोल बिश्नोई याच्या विरोधात लुकआउट सर्कुलर (LOC) नोटीसही जारी केली होती.
बाबा सिद्दीकी हत्याकांडाचा तपास करणाऱ्या मुंबई क्राईम ब्रँचला आरोपीच्या चौकशीदरम्यान गोळीबार करणारा लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याच्या थेट संपर्कात असल्याचे समोर आले होते. हत्येचा संशय असलेल्या तीन शूटर्सनी हत्येपूर्वी तुरुंगात बंद गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याच्याशी इन्स्टंट मेसेजिंग ॲप (स्नॅपचॅट) द्वारे बोलले होते. अनमोल बिश्नोई हा शूटर आणि सूत्रधार प्रवीण लोणकरच्या संपर्कात होता. अनमोल कॅनडा आणि अमेरिकेतून आरोपींच्या संपर्कात होता.
हेही वाचा: सलमान खानला धमक्या देण्यामागे नेमकं कारण काय? पोलिसांनी इंगा दाखवताच लॉरेन्स बिश्नोई घडाघडा बोलला
जानेवारीमध्ये एनआयएच्या पथकांनी पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि दिल्ली तसेच चंदीगडमध्ये एकूण 32 ठिकाणी छापे टाकले होते. या छाप्यात दोन पिस्तुल, दोन मॅगझिन आणि दारूगोळा, रोख रक्कम, कागदपत्रे आणि डिजिटल उपकरणे असा एकूण 4.60 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
एनआयएने जानेवारीमध्ये छापेमारी केलेली प्रकरणे बंदी घालण्यात आलेली दहशतवादी संघटना बीकेआय आणि देशात कार्यरत असलेल्या दहशतवादी-गुंड नेटवर्कद्वारे केलेल्या दहशतवादी कारवायांशी संबंधित आहेत. अशा कारवायांमध्ये शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा, स्फोटके आणि दहशत वादी हार्डवेअर जसे की IEDs यांची सीमापार तस्करी अशा प्रकारांचा समावेश आहे. दहशतवादी हार्डवेअरचा वापर दहशतवादी संघटनांचे ऑपरेटर/सदस्य आणि संघटित गुन्हेगारी सिंडिकेट देशाच्या विविध भागांमध्ये बॉम्बस्फोट, लक्ष्यित हत्या, खंडणी, दहशतवादी संघटनांना दहशतवादी निधी इत्यादी करण्यासाठी करत आहेत.