राज्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढत असून पुण्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. पुण्यातील भरती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. कुटुंबाचा जवळचा मित्र असलेल्या एका नराधमाने तब्बल सहा वर्षे आपल्या मित्राच्या मुलीचं लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी ४४ वर्षीय आरोपीला अटक केली आहे.
Pune Crime : तब्बल तीन हजार आरोपी वॉन्टेड; मोक्का कारवाईतील फरार आरोपींचीही संख्या वाढली
नेमकं काय घडलं?
२०१९ साली फिर्यादी त्यावेळी केवळ १९ वर्षाची होती. तेव्हापासून हा अत्याचार सुरु होता. आरोपी व फिर्यादीचं कुटुंब चांगल्या ओळखीचे असल्यामुळे आरोपी सतत फिर्यादीच्या घरात ये-जा करायचा. याचाच गैरफायदा घेत त्याने तिच्यावर अत्याचार करण्यास सुरुवात केली. 2019 मध्ये फिर्यादी घरात कपडे बदलत असताना आरोपीने तिचे गुपचूप फोटो मोबाईलमध्ये टिपले. नंतर हे फोटो दाखवत ते व्हायरल करण्याची धमकी दिली आणि त्याचा वापर करून तो वारंवार तिच्यावर शारीरिक अत्याचार करू लागला.
घरात कोणी नसतांना किंवा फिरतांना, चारचाकीतून प्रवास करताना आरोपी तिच्या अंगाला स्पर्श करून जवळीक साधण्याचा प्रयत्न करायचा. २०२० ते जुलै २०२५ दरम्यान आरोपीने अनेकदा वेळोवेळी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या नराधमाच्या कृत्यामुळे त्रस्त झालेल्या तरुणीने अखेर हा प्रकार कुटुंबियांना सांगितला. रोज घरात वावरणाऱ्या व्यक्तीचं हे घृणास्पद वर्तन ऐकून कुटुंबीय स्तब्ध झाले. कुटुंबीयांनी तात्काळ पोलिसांत धाव घेतली.
गुन्हा दाखल
पोलिसात त्यांनी तक्रार दाखल करून भारती विद्यापीठ पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 64, 64(2)(M), 74, 351(2) तसेच लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा (POCSO Act) 2012 मधील कलम 4, 8, 10, 12 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक स्नेहल थोरात करत आहेत.
दिल्ली हादरली! ६५ वर्षीय आईवर पोटच्या पोराकडून अत्याचार
६५ वर्षीय आईवरच पोटच्या पोराने दोनवेळा अत्याचार केल्याचा गुन्हा पोलिसात दाखल झाला आहे. आधी मुलाने आपल्या आईला चरित्रहीन असल्याचे सांगत वडिलांपासून वेगळं केलं, त्यानंतर वडिलांपासून घटस्फोट घेण्यासाठी आईवर दबाव टाकला,त्यानंतर आईवरच दोनवेळा अत्याचार केलं असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी महिलेने आपल्या पोरा विरुद्ध तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल होताच ३९ वर्षीय आरोपी मुलास पोलिसांनी अटक केली आहे.
Nagpur News: तुला कस्टडीत मारणार नाही ! पोलिसांनी बलात्कारातील आरोपीचे सोने घेतल्याचा आरोप