रत्नागिरीत चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश (फोटो- सोशल मीडिया)
गाड्यांमध्ये रात्रीच्यावेळी चोऱ्यांचे वाढले प्रमाण
चोरट्यांची ही टोळी अजून मोठी असण्याची शक्यता
पोलिसांनी सापळा रचून केली आरोपीना अटक
रत्नागिरी: नवनिर्मित रत्नागिरी रेल्वे पोलिस स्थानक (Ratnagiri News) हद्दीतील सापे वामने ते दिवाणखक्टी रेल्वे स्टेशन येथे रात्रीच्या वेळेस थांचणाऱ्या मेल एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांमधील प्रवाशांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने आणि मौल्यवान वस्तु, रोख रक्कम यांची चोरी (Crime News)करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखा नेरूळ युनिट पाच यांनी अत्यंता कुशलतेने सापळा रचून पर्दाफाश केला आहे. या टोळीतील एका महत्त्वाच्या आरोपीला जामखेड अहिल्यानगर येथे शिताफीने पकडून त्याच्याकडून पाचा चोरीचा गुन्ह्यामधील ५ लाख २ हजार रुपये किमतीचे ४२ ग्रॅम वजनाचे सोने क अन्य ३ गुन्ह्यांतील इतर मालमत्ता हस्तगता करून एकूण ८ गुन्हे उघडकीस आणले आहेत.
अटक केलेला आरोपी विनोद सखाराम जाधव जामखेड अहिल्यानगर याने दिलेल्या माहितीनुसार या टोळीता आणखी सहभागी असलेल्या तिघांची नाव सांगितली आहेत. मात्र या टोळीत आणखीही काही चोरटे आहेत का? याबाबतची चौकशी केली जात आहे, अशी माहिती लोहमार्ग मुंबई हार्बर विभागाच्या सहाय्यक पोलिस आयुक्ता नीलिमा कुलकर्णी यांनी आज रत्नागिरी येथे पत्रकार परिषदेत बोलताना दिली. चोरट्यांची ही टोळी अजून मोठी असण्याची शक्यता नाकारता येत नाही असेही यावेळी कुलकर्णी यांनी सांगितले. या चोरी प्रकरणातील आरोपी विनोद जाधव जामखेड अहिल्यानगर याला ३० नोव्हेंबरला अटक करण्यात आली असून त्याला १० डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
गाड्यांमध्ये रात्रीच्यावेळी चोऱ्यांचे वाढते प्रमाण
रत्नागिरी रेल्वे स्थानक येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेच्यावेळी रत्नागिरी रेल्वे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण पाडवी आणि उपनिरीक्षक सुनील लोणकर उपस्थित होते. या टोळीचा छडा लावल्या प्रकरणी अधिक माहिती देिताना सहाय्यक पोलिस आयुक्त नीलिमा कुलकर्णी यांनी पुढे सांगितले की, कोकण रेल्वे मार्गावरील सापे वामने ते दिवाणखवट दरम्यान मेल गाड्यांमध्ये रात्रीच्या वेळी
चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याचे आढळून आले या चोऱ्या नेमक्या कोण करीत आहे, कोणती टोळी यामागे आहे, याबाबत तपास सुरू करण्यात आला. रत्नागिरी रेल्वे पोलिस ठाण् यांच्या सूचना व मार्गदर्शनानुसार गुन्हे शाखा नेरूळ मुंबई युनिट ५ येथील पोलिस उपनिरीक्षक लोणकर व त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी अशा प्रकारचे गुन्हे हे जामखेड अहिल्यानगरमधील चोरटे करतात, अश माहिती मिळाल्यावर तपास सुरू केला.
सोन्याचे दागिने हिसकावले
आरोपी विनोद सखाराम जाधव वाने दिलेल्या माहितीनुसार हे चोरटे सापे वामने ते दिवाणखवटी स्टेशन कडे जाणान्या मार्गावर ज्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत तेथून जागे टाळायचे आणि त्यांच्यासाठी सुरक्षित मार्गाने स्टेशनपर्यंत पोहोचायचे त्याआधी स्टेशनपासून बऱ्याच अंतरावर ते डिझायर ही त्यांची गाडी उभी करून ठेवायचे आणि चालत चालत स्टेशनच्या परिसरात पोहोचायचे. स्टेशनवर रात्रीच्या वेळी कोणती गाडी थांबू शकते याची अॅप वरून माहिती घेऊन त्यानुसार चोरीचे नियोजन करायचे, झाडी झुडपात दबा धरून बसलेले हैं. बोरटे त्यानंतर रेल्वे आऊटर सिग्नलला उभी राहिल्यानंतर एक चोरटा दुसऱ्या चोरट्याच्या खांद्यावर उभे राहून रेल्वेच्या खिडकीतून हात घालून प्रवाशांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने तरीच खिडकीच्य वरती चुकाला अडकवलेल्या पर्स चोरी करायचे.






