पाकिस्तानी ISIसाठी गुप्तहेरी; राजस्थान गुप्तचर विभागाकडून मंगत सिंगला अटक
Rajsthan Crime News: राजस्थान पोलिसांच्या गुप्तचर विभागातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राजस्थान गुप्तचर विभागाने पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजेंस (ISI) साठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अलवर येथून मंगत सिंगला अटक केली आहे.
अलवर जिल्ह्यातील गोविंदगड येथील रहिवासी असलेला मंगत सिंग याच्यावर अधिकृत गुप्तहेर कायदा, १९२३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऑपरेशन सिंदूरचा भाग म्हणून ही अटक करण्यात आली आहे. मंगत सिंग याच्या अलवर छावणी परिसरात देखरेखीदरम्यान संशयास्पद हालचाली आढळून आल्याने गुप्तचर विभागाने ही कारवाई केली आहे.
ED ची मोठी कारवाई! 17,000 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात अनिल अंबानी ग्रुपच्या सीएफओला अटक
या कारवाईसंदर्भात एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मंगत सिंग गेल्या दोन वर्षांपासून सोशल मीडियाद्वारे पाकिस्तानी गुप्तचर संस्थांच्या संपर्कात होता. ईशा शर्मा नावाच्या एका महिला पाकिस्तानी हँडलरने त्याला हनीट्रॅप केले आणि सहकार्याच्या बदल्यात पैसे देऊ केले. जयपूरमधील केंद्रीय चौकशी केंद्रात विविध गुप्तचर संस्थांनी केलेल्या चौकशीनंतर आणि त्याच्या मोबाईल फोनची तांत्रिक तपासणी केल्यानंतर आरोपीचा सहभाग निश्चित झाला.
जैसलमेरमधील पाकिस्तानच्या हेर महेंद्र प्रसाद आणि हनीफ खान यांना यापूर्वी राजस्थान पोलिसांच्या सीआयडी (सुरक्षा) गुप्तहेरांनी अटक केली होती. महेंद्र डीआरडीओ गेस्ट हाऊसचा व्यवस्थापक असून चंदन फील्ड फायरिंग रेंजमध्ये काम करत होता, तर हनीफ खान पैशाच्या बदल्यात पाकिस्तानला गोपनीय लष्करी माहिती पाठवत होता. सीआयडीचे आयजी विष्णुकांत यांनी सांगितले की, राज्यातील हेरगिरीच्या कारवायांवर सतत लक्ष ठेवले जात आहे आणि सुरक्षा एजन्सी सतर्क आहेत.
ऑपरेशन ‘सिंदूर’ नंतर, राजस्थान गुप्तचर विभागाने अलवर परिसरात पाळत ठेव सुरु केली होती. अलवर कॅन्टोन्मेंट आणि गोविंदगड येथील रहिवासी मंगत सिंगच्या हालचाली संशयास्पद आढळल्याने त्यावर लक्ष ठेवले गेले. तपासात असे समोर आले की, मागील दोन वर्षांपासून मंगत सिंग सोशल मीडियाद्वारे पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेशी संपर्कात होता आणि ऑपरेशन ‘सिंदूर’ दरम्यान त्याने पाकिस्तानला महत्वाची माहिती पुरवली होती.
त्याला १० ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली. अनेक केंद्रीय आणि स्थानिक एजन्सींच्या संयुक्त तपासानंतर त्याच्या मोबाईल फोनमधून महत्त्वाचे पुरावे जप्त केले गेले आहेत. पोलिस सध्या मोबाईल फोनमधून मिळालेल्या माहितीची सखोल चौकशी करत आहेत.
गुप्तचर विभागाचे डीआयजी राजेश मील यांनी सांगितले की, मंगत सिंग सतत दोन पाकिस्तानी नंबरशी संपर्कात होता आणि सैन्याशी संबंधित महत्त्वाची माहिती पाठवत होता. या बदल्यात त्याला मोठ्या प्रमाणात पैसे मिळत होते. चौकशी दरम्यान अनेक महत्त्वाचे खुलासे झाले आहेत. पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या या एजंटने अलवर आर्मी मुख्यालयासह लष्कराच्या विविध क्षेत्रांची माहिती पाकिस्तानी आयएसआयला पाठवल्याची माहिती समोर आली आहे.