शीतल तेजवानीला 8 दिवसांची पोलिस कोठडी (फोटो- सोशल मीडिया )
शीतल तेजवानीला 8 दिवसांची पोलिस कोठडी
मुंढवा येथील भूखंड प्रकरणात कोर्टाचा निर्णय
शीतल तेजवानीला बुधवारी करण्यात आली होती अटक
Sheetal Tejwani Arrested: मुंढवा येथील जमीन घोटाळा प्रकरणी प्रमुख आरोपी असलेल्या शीतल तेजवानीला बुधवारी अटक करण्यात आली होती. आज शीतल तेजवानीला पुणे (Crime News) कोर्टात हजर करण्यात आले. तब्बल 4 ते साडे चार कोर्टात सुनावणी पार पडली. पोलिसांनी प्रथम 14 दिवसांच्या कोठडीची मागणी केल्याचे समोर आले. मात्र सुनावणी झाल्यावर कोर्टाने शीतल तेजवानीला 8 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.






