परीक्षण देण्यासाठी महाविद्यालयात निघालेल्या विद्यार्थिनीला कारणे उडवल्याचे समोर आले आहे. अपघातात विद्यार्थिनीचा पाय फ्रॅक्चर झाला असून तिला गंभीर दुखपत झाली आल्याचे समोर आले आहे. या घटनेचा व्हिडीओ सीसीटीव्हीत कैद झाले आहे. या दृश्यांमध्ये कार चालकाची चूक असल्याचं स्पष्टपणे दिसून येतं आहे. मात्र विद्यार्थिनी बाईक वरुन पडल्यानं अपघात झाला असून आमच्याकडे कोणतीही तक्रार आली नाही, असं मंचर पोलीसांचं म्हणणं असल्यानं त्यांची भूमिका संशयास्पद असल्याचं ही स्पष्ट होतंय.
मिळालेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना २३ सप्टेंबरच्या सकाळी पुण्याच्या मंचरमध्ये पिंपळगाव फाटा परिसरात स्वामी समर्थ मंदिराजवळ हा अपघात घडला आहे. मंचर येथील अण्णासाहेब आवटे महाविद्यालयात परीक्षा देण्यासाठी निघालेल्या एका विद्यार्थिनीला भरधाव कारने जबर धडक दिली. या अपघातात जखमी झालेल्या विद्यार्थिनीचा ऋतुजा चंद्रकांत पारधी (वय १९, राहणार पिंपळगाव-खडकी) असे आहे. या भीषण अपघाताचे थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. आणि स्पष्ट दिसत आहे.
ऋतुजा ही रसायनशास्त्राच्या प्रात्यक्षिक परीक्षेसाठी पायी जात असताना समोरून येणाऱ्या कारने ऋतुजाला जोरात ठोकरले. धक्क्याची तीव्रता एवढी होती की ती थेट सात- आठ फूट उंच हवेत फेकली गेली आणि नंतर रस्त्यावर कोसळली. या धडकेत तिच्या डाव्या पायाला तसेच टाचेला गंभीर इजा झाली आहे.रक्तबंबाळ झालेल्या अवस्थेत तिचा जीव धोक्यात आहे असे वाटत होते. पण डॉक्टरांनी तिची प्रकृती आता स्थिर असल्याचं सांगितलं आहे.धडकेनंतर वाहनचालक शरदराव शिंदे यांनी तातडीने तिला खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र दुसऱ्या दिवशी रात्रीपर्यंत या घटनेची कोणतीही फिर्याद मंचर पोलिस ठाण्यात नोंदवली गेली नव्हती. असे समोर आले आहे. मात्र विद्यार्थिनी बाईक वरुन पडल्यानं अपघात झाला असून आमच्याकडे कोणतीही तक्रार आली नाही, असं मंचर पोलीसांचं म्हणणं आहे. त्यामुळे मंचर पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचं समोर आले आहे.
नावाला आयुर्वेदिक स्पा सेंटर, आत भलताच प्रकार; पुण्यातून 5 मुलींची सुटका
दरम्यान, पुण्यातील मार्केटयार्ड परिसरात पुणे पोलिसांनी काळा प्रकार उघडकीस आणला आहे. आयुर्वेदिक मसाजच्या नावाखाली स्पा सेंटर चालवलं जात होत. मात्र आत मध्ये वेश्या व्यावसायिक चालवला जात होता. ही माहिती पोलिसांना मिळाली आणि पोलिसांनी धाड टाकून या कारवाईत 5 मुलींची सुटका केली आहे. दोन ठिकाणी पुणे पोलिसांनी कारवाई केल्या आणि मुलींची सुटका केली.
कुत्रे भुंकल्याचा जाब विचारल्यामुळे राग अनावर; दोघांवर चाकूने सपासप वार केले अन्…