भीषण अपघातामध्ये तरुणांचा मृत्यू (फोटो- istockphoto)
कंटेनरखाली येऊन तीन तरुणांचा मृत्यू
मुंब्य्रात भीषण अपघात
परिसरात व्यक्त केली गेली हळहळ
Accident News: ठाणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. ठाणे जिल्ह्यातील मुंब्य्रात एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये तीन तरुणांचा मृत्यू झाला आहे. भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरने एका दुचाकीला धडक दिली आहे. यामध्ये तीन तरुणांचा मृत्यू झाला आहे. 3 मुलांचा जीव गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मुंब्रा येथे तीन मुले दुचाकीवरून प्रवास करत होती. गावदेवी बायपास या ठिकाणी या तरुणांच्या दुचाकीला भरधाव कंटेनरने जोरदार धडक दिली. कंटेनरखाली आल्याने या तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर या ठिकाणी मोठी गर्दी जमा झाली. घटनेची माहिती मिळताच पोलिस देखील या ठिकाणी दाखल झाले. पोलिस पुढील तपास करत आहेत.
भरधाव कारची ट्रेलरला जोरदार धडक
भरधाव कारची ट्रेलरला जोरदार धडक बसल्याने अपघात झाला. यामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-५३ वर चिखली-रमथमनजीक घडली. या अपघाताची माहिती मिळताच पोलिस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्याकडून बचावकार्य सुरु करण्यात आले.
एका चारचाकी वाहनाने प्रवासी जळगावकडून नागपूरकडे येत होते. महामार्गावर मलकापूर तालुक्यातील चिखली-रमथमनजीक चारचाकीने समोरील ट्रेलरला जबर धडक दिली. त्यामुळे भीषण अपघात घडला. या घटनेची माहिती मिळताच, एमआयडीसी पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृत व गंभीर जखमींना येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविले. त्यात गंभीर जखमी असलेल्या चार जणांना जळगाव खान्देश येथे हलविण्यात आले. तर एकाला बुलढाणा येथे उपचारासाठी हलविण्यात आले होते.
भरधाव कारची ट्रेलरला जोरदार धडक; पाच जणांचा मृत्यू तर चौघे गंभीर जखमी
मृत चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
या अपघातात चार प्रवासी गंभीर जखमी झाले असून, त्यांना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले होते. या अपघातात जखमी पंकज दिलीप गोपाळ (२२. रा. नांद्रा हवेली, ता. जामनेर, जि. जळगाव). दीपिका विश्वास (३०, रा. कोलकाता, पश्चिम बंगाल) टीना अंदाजे अजय पाटील (४५, रा. भुसावळ) व एक अनोळखी महिला यांचा समावेश आहे. या घटनेबाबत अक्षय भास्कर सोनवणे (२२, रा. चिखली, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. यावरून आरोपी मृत चालक साजिद बागवान याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.