काय घडलं नेमकं?
किरण जयराम बाबर (वय अंदाजे ३० ते ३२ वर्षे) असे आहे. तर तिच्या पतीचे नाव जयराम तोताराम बाबर असे आहे. हे दोघेही पती-पत्नी मूळचे मध्यप्रदेशातील रहिवासी असून ते खराडी परिसरातील एका लेबर कॅम्पमध्ये राहतात. उदरनिर्वाहासाठी ते कचरा गोळा करणाऱ्या गाडीवर काम करत होते. मंगळवारी मध्यरात्री दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. याच संतापाच्या भरात जयराम बाबर याने घरातील छोटा गॅस सिलेंडर उचलून पत्नी किरण हिच्या डोक्यात जोरदार मारला. या हल्ल्यात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने तिचा मृत्यू झाला.
Delhi : दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, लैंगिक अत्याचारानंतर चिमुकलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा एनकाउंटर
या घटनेची माहिती मिळतच खरेदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे . पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
आधी ५० कोटींची खंडणी, नंतर थेट गोळीबार! पुण्यात रात्री नेमकं काय घडलं?
गैंगस्टर लॉरेन्स बिष्णोई टोळीचे पुणे कनेक्शन दोन वेगवेगळ्या घटनांमधून समोर आल्यानंतर आता या टोळीने पुण्यात पाय रोवण्यास सुरूवात केली असून, प्रसिद्ध व्यावसायिकांना ५० कोटींच्या खंडणीसाठी आधी फोनद्वारे धमकी देऊन नंतर काही तासातच त्यांच्या दुकानावर गोळीबार घडवून आणल्याची धक्कादायक घटना रात्री घडली. याघटनेमुळे पुर्ण शहरात खळबळ तर उडाली आहेच पण बिष्णोई टोळीच्या या गोळीबाराने व्यावसायिकांमध्ये भितीचे वातावरण देखील निर्माण केले आहे. हडपसर-सासवड रस्त्यावरील फुरसुंगी भागात हा प्रकार घडला आहे. दरम्यान, गोळीबारानंतर गुन्हे शाखेच्या अपर पोलिस आयुक्त तेजस्वी सातपुते, सहायक आयुक्त शैलेश संखे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. रात्री उशीरापर्यंत गोळीबार करणाऱ्यांचा शोध पोलिस घेत होते.
लग्नाच्या केवळ 24 तासांतच नवरी गेली पळून; सुखी जीवनाचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणाला गंडा
Ans: ही घटना पुण्यातील खराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.
Ans: मृत महिलेचे नाव किरण जयराम बाबर (वय अंदाजे 30 ते 32 वर्षे) असे आहे.
Ans: पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून आरोपीचा शोध सुरू केला आहे.






