टेम्पो चालकाने दिली कबुली तेव्हा कळाल दारूचा माल!
पोलिसांनी जेव्हा गाडी अडवली आणि चालकाला विचारणा केली तेव्हा त्याने गाडीत दारू असल्याचं सांगितलं. विदेशी दारू आहे अस सांगितल्यावर परवाना मागण्यात आला. दिगंबर शाहू (वय २५) अस त्या चालकाच नाव असून तो मुळचा राहणारा हे मुखेड नांदेडचा आहे. त्याला दारूचा परवाना मागितल्यावर त्याने नसल्याच सांगितल तेव्हा पोलिसांनी यावर कारवाई केली माल ताब्यात घेतला. यामध्ये विदेशी दारू आढळून आली आहे. विदेशी दारूच्या ७ हजार बॉटेल या मध्ये आढळून आल्या आहेत. टेम्पो सह २३ लाख रुपये किमतीचा माल ताब्यात घेतला आहे.
दारू नक्की कुठे जात होती?
निवडणुकीच्या काळात मतदारांना दारू वाटायचे प्रकार अनेक उघडकीस आले आहेत. अनेक ठिकाणचे वीडियो व्हायरल झालेल आपण पाहील आहे. मात्र एवढ्या किमतीची विदेशी दारू परवाना नसताना कुठे नेली जात होती? हा सवाल आहे. पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास हा पोलिसांकडून केला जात आहे. रात्रीच्या वेळी गस्त घालत असताना हा प्रकार उघडकीस आला आहे. पुणे पोलिसांच्या परिमंडळ ७ या शाखेकडून या वर कारवाई करण्यात आली आहे. सध्या पोलीस ही दारू कुठून गेला आहे आणि ही कुठे दिली जाणार होती याचा शोध घेत आहेत. या मध्ये अवैध रित्या विदेशी दारू विकणारे रैकेट सक्रिय असण्याची शक्यता आहे. पोलिसांमार्फत याची चौकशी केली जात आहे.
Ans: पुण्यातील वाघोली केसनंद रोडवर ही कारवाई करण्यात आली.
Ans: सुमारे 16.74 लाख रुपयांची विदेशी दारू आणि टेम्पोसह एकूण 23 लाखांचा मुद्देमाल जप्त झाला.
Ans: निवडणूक काळात मतदारांना दारू वाटपासाठी अवैध दारू रॅकेट सक्रिय असल्याचा संशय आहे.






