काय घडलं नेमकं?
ही धक्कादायक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना उत्तरप्रदेश येथील गाझियाबादमध्ये घडली आहे. रविवारी रात्री चिमुलीचे वडील मोहम्मद अक्रम आणि सावत्र आईने चिमुकलीला अमानुष मारहाण केली. एवढेच नाही तर तिला रात्री कडाक्याच्या थंडीत घराच्या गच्चीवर सोडून दिले. हा अमानुष अत्याचार चिमुकलीला सहन न झाल्याने ती बेशुद्ध पडली. हे कळताच तिला वडील आणि आईने हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. सोमवारी पहाटे तीन वाजताच तिचा मृत्यू झाला. याआधी शनिवारीही त्या चिमुकलीला मारहाण केली होती.
आजोबांनी केली तक्रार दाखल
चिमुकलीचा या प्रकरणात मृत्यू झाल्याचे समजताच तिच्या आजोब मोहम्मद जहीर यांनी गाझियाबादमधील वेव सिटी पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की चिमुकलीला क्रूरपणे मारहाण करण्यात आली होती. तसेच हॉस्पिटलमध्ये प्रकरणाशी संबंधित असलेली कागदपत्रे तपासली जात आहेत. आरोपींना चौकशी साठी बोलावण्यात आले असून त्यांना लवकरच अटक करण्यात येईल. पुढील कारवाई सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
पोस्ट मार्टम रिपोर्टमध्ये काय?
पोस्ट मार्टम रिपोर्टमध्ये चिमुकलीच्या शरीरावर तब्बल १३ जखमा आढळून आले आहे. तिची अनेक हाडं मोडली आहे. छातीच्या आतील भागात रक्तस्त्राव झाला आहे. असे पोस्ट मार्टम रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे.
Ans: उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे ही धक्कादायक घटना घडली.
Ans: सावत्र आई आणि वडिलांनी केलेल्या अमानुष मारहाणीमुळे चिमुकलीचा मृत्यू झाला.
Ans: शरीरावर 13 हून अधिक जखमा, अनेक हाडे मोडलेली आणि छातीतील रक्तस्त्राव असल्याचं निष्पन्न झालं.






