Budget Vlogging Phones: 50 हजार रुपयांहून कमी किंमत आणि कॅमेरा आहे टॉपक्लास! हे स्मार्टफोन्स कंटेट क्रिएटर्ससाठी बेस्ट पर्याय
भारतीय बाजारात हा स्मार्टफोन नुकताच लाँच करण्यात आला आहे. या डिव्हाईसची सुरुवातीची किंमत 44,999 रुपये आहे. हा स्मार्टफोन अशा यूजर्ससाठी एक चांगला पर्याय ठरणार आहे, ज्यांना परफॉर्मंस आणि कॅमेरा या दोन्हीचे कॉम्बिनेशन पाहिजे आहे. या डिव्हाईसमध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 8MP अल्ट्रा-वाइड लेंस दिला आहे. फोनचा 32MP फ्रंट कॅमेरा व्लॉगिंग आणि सेल्फी व्हिडीओसाठी एक चांगला पर्याय आहे. सर्वात खास गोष्ट म्हणजेच लो-लाइटमध्ये देखील कॅमेरा संतुलित रंग आणि डिटेल कॅप्चर करतो. जर तुम्ही ट्रॅ्व्हल किंवा नाईट व्लॉग शूट करत असाल तर हा स्मार्टफोन तुम्हाला नक्कीच चांगला आऊटपूट देणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
Vivo नेहमीच कॅमेरा फोक्स्ड स्मार्टफोन लाँच करण्यावर लक्ष केंद्रीत करतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे Vivo V60 5G. या डिव्हाईसची किंमत भारतात 36,999 रुपये आहे. फोनमधील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे डिव्हाईसमधील 50MP टेलीफोटो कॅमेरा आहे,जो 3x ऑप्टिकल झूम ऑफर करतो. डिव्हाईसमध्ये वेगवेगळे फोकल लेंथ जसे 23mm, 50mm आणि 85mm वर शूटिंग करण्याचा पर्याय व्लॉगर्ससाठी फायदेशीर ठरतो. याशिवाय डिव्हाईसमध्ये तिन कॅमेऱ्यांसह 4K व्हिडीओ रेकॉर्ड करण्याची सुविधा मिळते.
Oppo च्या या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 45,999 रुपये आहे. या स्मार्टफोन विशेषत: कंटेंट क्रिएटर्ससाठी डिझाईन करण्यात आला आहे. या डिव्हाईसमध्ये 50MP प्राइमरी कॅमेरा, 50MP टेलीफोटो कॅमेरा आणि 8MP अल्ट्रा-वाइड सेंसर देण्यात आला आहे. फोनचा 50MP ऑटोफोकस सेल्फी कॅमेऱ्यामुळे हा स्मार्टफोन व्लॉगिंगसाठी एक खास डिव्हाईस ठरते. प्रवासात व्हिडिओ रेकॉर्ड करताना चेहऱ्यावर लक्ष केंद्रित करणे अधिक सोपे होते. यासोबतच 4K 60fps व्हिडीओ रेकॉर्डिंग सपोर्ट व्हिडीओ क्वालिटी अधिक चांगली करते.
जर तुम्हाला नैसर्गिक रंग आणि स्मार्ट AI कॅमेरा पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच Google Pixel 10a ची निवड करू शकता. या स्मार्टफोनची किंमत 49,999 रुपये ठेवण्यात आली आहे. या स्मार्टफोनमध्ये 48MP प्राइमरी कॅमेरा आणि 13MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा दिला आहे. गुगलचे AI फीचर्स जसे ऑटो बेस्ट टेक, कॅमेरा कोच आणि एडवांस फोटो एडिटिंग टूल्स कंटेंट क्रिएटर्ससाठी फायदेशीर ठरतात. विशेषतः जेव्हा स्थिर व्हिडिओ आणि रंग विज्ञानाचा विचार केला जातो, त्यावेळेस पिक्सेल फोन बरेच विश्वासार्ह मानले जातात.
OnePlus 15R सध्या 47,999 रुपयांच्या किंमतीत खरेदीसाठी उपलब्ध आहे. या डिव्हाईसमध्ये 50MP मुख्य कॅमेरा आणि 32MP फ्रंट कॅमेरा दिला आहे. हा फोन डे-लाइट वीडियो रिकॉर्डिंग आणि सोशल मीडिया कंटेंटसाठी एक चांगला पर्याय ठरतो. OnePlus चा क्लीन सॉफ्टवेयर अनुभव आणि स्थिर वीडियो आउटपुटमुळे हा स्मार्टफोन बेस्ट निवड ठरू शकतो.






