छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर येथून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. एका अल्पभूधारक शेतकऱ्याने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आत्महत्या निराशातून झाली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय. सुरेश मुळे असे या शेतकऱ्याचे नाव असून वरुड काजी गावातील हा रहिवासी आहे. या घटनेमुळे शेतकऱ्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय.
Pune Crime : जिथे गोळ्या घातल्या आणि कोयत्याने हल्ला केला, तिथेच घायवळ गँगची पोलिसांनी धिंड काढली
काय घडलं नेमकं?
सुरेश मुले हे वरुड काजी येथील अल्पभूधारक शेतकरी होते. त्यांच्या कुटुंबात आई आणि दोन मुले आहेत. त्यांना दोन एकर शेती असून, गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. शनिवारी सुरेश बराच वेळ घरी परतले नाहीत. कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला, परंतु सुरेश मुळे सापडले नाहीत. काही वेळानंतर गावकऱ्यांना माहिती मिळाली की सुरेश मुळे यांनी शेतातील झाडाला गळफास घेऊन आपले जीवन संपवले आहे. घटना उघडकीस आल्यावर गावात मोठी खळबळ उडाली आहे. प्राथमिक अंदाजानुसार, आर्थिक ताण आणि मानसिक नैराश्यामुळे ही आत्महत्या झाल्याचे दिसते, मात्र नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यू नोंद करण्यात आली आहे.
अतिवृष्टीनं बळीराजा उध्वस्त
महाराष्ट्रच्या अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. नदीकाठच्या गावांत शेतजमिनी पाण्याखाली गेल्या, पिकांचे मोठे नुकसान झाले, रस्ते वाहून गेले, पूल उध्वस्त झाले आणि विद्युत पोल आडवे झाले. पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले आहेत. पीक विमा देखील वेळेवर मिळत नसल्याने शेतकरी ताणात आहे. काही ठिकाणी पीक संपूर्ण नष्ट झाल्याने शेतकऱ्यांवर कर्जबाजारीपणाचं संकट अधिक गडद झालं आहे. सरकारकडून तातडीने मदतीचे पावले उचलली गेली नाहीत, तर हे संकट आणखी तीव्र होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या सगळ्या कारणामुळे शेतकरी टोकाचे पाऊल उचलत आहे.
22 वर्षीय फार्मसिस्ट तरुणीची आत्महत्या
छत्रपती संभाजीनगर येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. ८ सप्टेंबरला एका २२ वर्षीय तरुणीनेआत्महत्या केली आहे. आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव निकिता रवींद्र पवार असे आहे. तिने आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यात ‘मम्मी, दादा, आजी-आजोबा, मला माफ करा’ असं लिहिलेलं होत. ब्लॅकमेलिंगच्या तणावातून तरुणीने टोकाचं पाऊल उटलल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळत आहे.