उदयपूर येथील गोगुंदा पोलिसांनी गेल्या रविवारी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी १८ मुलं आणि १० मुलीना अटक केली आहे. गोगुंदा पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या दोन फार्म होऊसमध्ये रेव्ह पार्टी आणि वेश्यावृत्तीचा धंदा चालत होता. पोलिसांनी त्यांच्याकडून अनेक आक्षेपार्ह वस्तू जप्त केल्या आहेत.
Pune News : सासरच्या छळाला कंटाळून एका विवाहित तरुणीने उचलले टोकाचे पाऊल; पुण्यातील धक्कादायक प्रकार
नेमकं काय घडलं?
उदयपूरमधील गोगुंदा येथे एका फार्महाउसमध्ये रेव्ह पार्टी सुरु होती. तर दुसर्या पार्टीमध्ये वेश्यावृत्तीचा धंदा सुरु होता. सुत्रांकडून माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी रविवारी मध्यरात्री तिथे छापा टाकला तेव्हा एकच खळबळ उडाली. अटक करण्यात आलेल्या मुली राजस्थानच्या नव्हत्या त्यांना बाहेरून बोलावण्यात आहे होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वेश्यावृत्तीच्या काळ्या धंद्यांबाबत बर्यात तक्रारी येत होत्या. यांनतर पोलिसांनी त्यांच्या गुप्तचरांना सक्रिय केलं. रविवारी पोलिसांना परिसरातील दोन फार्म हाऊसवर रेव्ह पार्टी आणि इतर गैरकृत्य होत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तिथे एकाच वेळी धाड टाकली. पोलिसांनी दोन्ही ठिकाणाहून 18 मुलं आणि 10 मुलींना अटक केली आहे. पोलिसांच्या तपासात समोर आले आहे की, वेश्यावृत्तीसाठी या मुलींना बाहेरून बोलावण्यात आले होते. पोलिसांनी ही कारवाई माताजी खेडा येथील पियाकल प्रियांका पीपी फार्म हाऊस आणि खुमानपुरा येथील द स्काय साइन हॉलिडे फार्म हाऊस येथे केली.या कारवाईत एका एनआरआयलाही अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून एकूण 3,20,000 रुपयांचे डॉलर जप्त केले आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे PA असल्याची बतावणी करत ५५ लाखांची फसवणूक
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा स्वीय सहाय्यक असल्याचे सांगत नोकरी लावण्याच्या बहाण्याने १८ जणांचा फसवणूक केल्याचा धक्कदायक प्रकार समोर आला आहे. जळगावमधील १८ जणांनी ५५ लाख ६० हजार रुपयांमध्ये फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. फसवणूक करणाऱ्या हितेश संघवी नरपती संघवी असे पती- पत्नीचे नाव आहे. हे दोघे मूळचे पाचोरा येथील रहिवासी असून ते नवी मुंबई येथे राहत असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या दोघांनी एकनाथ शिंदे यांचा स्वीय सहाय्यक असल्याचे ओळखपत्रे, लेटर पॅड व अपॉइंटमेंट लेटर दाखवून जळगावमधील हर्षल बारी या तरुणांसह १८ जणांची फसवणूक केली आहे. या सर्वांना नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने तब्बल ५५ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक झाली. या प्रकरणाने शनिपेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान शनिपेठ पोलिसांकडून हा गुन्हा आर्थिक हा गुन्हा शाखेकडे वर्ग करण्यात आला असून आर्थिक गुन्हे शाखेकडून याप्रकरणी तपास केला जात आहे.
Nagpur Crime :नागपुरात खळबळ! रस्ते खोदकामादरम्यान सापडले 4 मानवी सांगाडे