अकोल्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कल्याण रेल्वे स्थानकात फिरण्यासाठी आलेल्या एका १६ वर्षीच्या अल्पवयीन मुलीसोबत ओळख वाढवून तिला रेल्वेने अकोल्याला नेत असतांना नराधमाने तिच्यावर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे.
बलात्कारानंतर त्याने अकोला स्थानकात तिला सोडले आणि पसार झाला. यानंतर अकोला रेल्वे पोलिसांची नजर या मुलीवर पडली. त्यांनी पीडित मुलीची चौकशी केली असता हा प्रकार समोर आला.
नेमकं काय घडलं?
पीडित अल्पवयीन मुलगी कल्याण पूर्वेत राहते. तिची मानसिक स्थिती ठीक नव्हती. २९ जून रोजी ही तरुणी कल्याण स्टेशन परिसरात आली होती. कल्याण पश्चिमेकडून पूर्वेकडे पादचारी पुलावरून जात होती. तेव्हा एका तरुणाने तिला हेरले. तिच्याशी ओळख वाढवत तिच्याबरोबर चालत तो कल्याण पूर्वेकडे आला. त्याने तिच्याशी गप्पा मारत तिला आपल्या भावाच्या घरी नेले. मात्र भावाने तिला घरात घेण्यास नकार दिला. तो तिला परत कल्याण रेल्वे स्थानकात घेऊन आला.
त्याने त्यामुलीसोबत अकोला एक्सप्रेस पकडली. इगतपुरी आणि अकोला दरम्यान त्याने या मुलीवर बलात्कार केला. यानंतर नराधम आणि मुलगी अकोला स्थानकात उतरले. तो तिला अकोला येथील त्याच्या घरी घेऊन गेला. मात्र त्याच्या घरच्यांनी तिला स्वीकारण्यास नकार दिल्याने त्याने पुन्हा तिला अकोला रेल्वे स्थानकात आणून सोडून दिले. अकोला रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत हा गुन्हा कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात वर्ग केला. तर या तरुणीला कल्याण रेल्वे पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. दरम्यान या प्रकरणी सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध सुरु असल्याचे कल्याण रेल्वेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांनी सांगितले.धक्कादायक म्हणजे दोन वर्षांपूर्वी याच अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला होता. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
आरोपीची पोलिस कोठडीत आत्महत्या; टॉवेलने गळफास घेऊन संपवलं जीवन
मुंबई : पोलिस कोठडीत आत्महत्या करणे असे प्रकार आता अनेकदा घडल्याचे पाहिला मिळत आहे. त्यातच आता एका आरोपीने पोलिस कोठडीत आत्महत्या करून जीवन संपवलं. अंकित राय (वय २६) असे या आरोपीचे नाव आहे. अंकित राय याने सहार पोलिस ठाण्याच्या कोठडीत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
अंकित राय आत्महत्या प्रकरणाचा मुंबई गुन्हे शाखेने सखोल तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे पोलिस कोठडीत सुरक्षा आणि मानक प्रक्रियांमध्ये संभाव्य त्रुटींबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. मुंबई गुन्हे शाखेने हे प्रकरण ताब्यात घेतले आहे आणि लॉकअपची देखरेख व्यवस्था, कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांचे रेकॉर्ड आणि कोठडी प्रोटोकॉलचे पालन याची बारकाईने तपासणी करत आहे. निष्काळजीपणा किंवा गैरप्रकाराची शक्यता देखील नाकारता येत नाही.
‘लवकरच जेवणासाठी घरी येतो’ म्हणत जे.जे.रुग्णालयातील डॉक्टरची आत्महत्या; अटल सेतूवरून खाडीत उडी