नवी मुंबई : एक धक्कादायक तसेच मन हेलावून टाकणारी बातमी समोर येत आहे. आत्महत्या हा शेवटचे टोक आहे, आयुष्यात अपयशी ठरल्यामुळं अनेकांनी आत्महत्या करत आयुष्य संपवलं. मात्र ज्यांनी आताच कुठे जग पाहिले आहे, जग समजून घेत आहेत, अश्यानीच जर आत्महत्या केली तर…ऐकून धक्का बसले ना, हो, पण खरे आहे. मनपाच्या शाळेत (School) पाचवीत शिकणाऱ्या एका मुलीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी रात्री नवी मुंबईत घडली आहे. (Sucide navi Mumbai school student) त्यामुळं सर्वांना धक्का बसला असून, या मुलीनी शेवटचे टोक गाठल्यामुळं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
[read_also content=”चार महिन्यात वित्तीय तूट १०० अब्ज डॉलरवर पोहोचली, हे केंद्र सरकारचे अपयश, राष्ट्रवादीची मोदी सरकारवर टिका https://www.navarashtra.com/maharashtra/last-four-months-country-economy-going-very-low-ncp-mahesh-tapase-311999.html”]
दरम्यान, आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आरती सोनार (११) (Aarti Sonar) असे असून ती महापालिकेच्या शाळेत पाचवीत शिकत होती. (five standard school) अनेक दिवसांपासून ती मानसिक तणावात होती. दरम्यान, ती शाळेत जात नसल्याने आई (mother) तिला ओरडली होती. त्यातून हा प्रकार घडला असल्याची शक्यता रबाळे एमआयडीसी पोलिसांनी (rabale midc police station) वर्तवली आहे. बुधवारी ओढणीने गळफास लावलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आला.