gun (फोटो सौजन्य - pinterest)
पंढरपूरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दोन अल्पवयीन मुलं दोन पिस्टल आणि जिवंत काडतूसांसह पोलिसांना सापडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. एका इसमाचा खून करण्याच्या उद्देशाने आलेल्या चौघांमधील हे दोन आरोपी असल्याचं पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यातील दोन आरोपी पसार झाल्याने पोलिसांनी त्यांचा शोध सुरु केला आहे.
तामिळनाडूमधून विचित्र घटना समोर; शारीरिक संबंधादरम्यान मृत्य झाल्याचा दावा, परंतु सत्य काही वेगळच
चार अल्पवयीन मुले एका इसमाचा खून करण्याच्या उद्देशाने पंढरपूर शहरातील न्यायालय परिसरात आले होते. त्यातून दोन अल्पवयीन आरोपींना पोलिसांनी सापळा रचून पकडल्याचे समोर आले आहे. ताब्यात घेतलेल्या दोघांकडे प्रत्येकी एक लोखंडी देशी बनावटीचे पिस्टल, दोन मॅग्झीन व चार जिवंत काडतूस सापडली आहेत. तर पळून गेलेल्या दोघांचे नाव यश अंकुशराव (रा. कोळी गल्ली), गोपाळ अंकुशराव ( रा.पंढरपूर) असे नाव असल्याचे चौकशीत समोर आले आहे.
याबाबत पंढरपूर गुन्हे प्रकटीकरण पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीवरून जुना कासेगाव रॉड येथे मोटार सायकलीवरून येत असतांना, पोलिसांनी गराडा घालून दोन अल्पवयीन आरोपिंना जागीच पकडले. यातील दोन अल्पवयीन दुसऱ्या मोटार सायकलीवरून येत होते, परंतु पोलिसांना पाहून पळून गेले. त्यामध्ये यश अंकुशराव, गोपाळ अंकुशराव असल्याचे चौकशीत समोर आले आहे.
पकडलेल्या अल्पवयीन मुलांकडे पिस्तूल वापरण्याचा परवाना नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यांना पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात आणून भारतीय हत्यार कायदाचे १९५९ कलम-३, २५, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलाम ६१(२) तसेच मुंबई पोलिस अधिनियम कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार असलेलं दोन आरोपीनंचा तपास पोलीस करीत आहे. हे चार आरोपी कोणाच्या हत्येसाठी आले होते याचा तपास पोलीस करत आहे.
चारित्र्याच्या संशयावरून तरुणाने केली महिलेची हत्या; रॉडने सपासप वार केले अन्…