कोल्हापुर: कोल्हापुरातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. कोल्हापूर येथील पन्हाळा तालुक्यातील नावली गावातून एक घटना समोर आली आहे. घरघुती वादातून सेवानिवृत्त सैनिक नीलेश राजाराम मोहिते याने आपल्या बहिणीच्या नवऱ्यावरच गोळी झाडली आहे. हि घटना सोमवारी घडली आहे. या घटनेनं परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
महिलेने सराफाला घरी बोलावले, नंतर नवरा आला अन्…; पुढे जे घडलं ते वाचून हादरून जाल
नेमकं काय घडलं?
सोमवारी सकाळी विनोद अशोक पाटील (वय 39) हे गल्लीत पोस्टर लावत असताना त्यांच्यात आणि नीलेश मोहिते यांच्यात जुन्या वादातून वादावादी झाली. तेव्हा संतापलेल्या निलेशने घरातून पिस्तूल आणले. प्रथम हवेत गोळी झाडत धाक दाखवला आणि नंतर थेट विनोदच्या मांडीवर गोळी झाडली. या हल्ल्यात विनोद गंभीर जखमी झाली आहे. विशेष म्हणजे गोळी झाडल्यानंतर आरोपी निलेश यानेच जखमीला उचलून कोडोलीतील खासगी रुग्णालयात दाखल केले.
याघटनेमुळे परिसरात आणखी खळबळ उडाली आहे. प्राथमिक चौकशीत समोर आले आहे की, २०१४ साली विनोद पाटील यांनी त्यावेळी निलेशच्या बहिणीशी प्रेमविवाह केला होता. या विवाहाला मोहिते कुटुंबीयांनी सुरुवातीपासूनच तीव्र विरोध दर्शवला होता. परिणामी दोन्ही कुटुंबांमध्ये संबंध तणावपूर्ण राहिले. याच रागातून सोमवारी सकाळी घडलेली वादावादी इतकी वाढली की हा वाद गोळीबारापर्यंत पोहोचला.
घटनेची माहिती मिळताच शाहूवाडी विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी आप्पासाहेब पवार यांनी रुग्णालयात जाऊन जखमीची विचारपूस केली. त्यांनतर फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या पथकाने घटनास्थळी भेट देत पुरावे गोळा केले. पोलिसांनी आरोपी निलेश याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडग यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
दरम्यान, चारच दिवसात दोन वेळा गोळीबार झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. चार दिवसापूर्वी शिये फाटा येथे किरकोळ वादातून संशयिताने हवेत गोळ्या झाडल्याचा प्रकार घडला होता. त्यावेळी मोठा अनर्थ टळला होता, मात्र सलग घडणाऱ्या घटनांनी पोलीस यंत्रणेसमोर कठीण आव्हान उभे केले आहे. जिल्हा पोलिस प्रशासनाने कठोर कारवाईचे संकेत देत सर्वाधिक संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र वारंवार होणाऱ्या गोळीबाराच्या घटनांनी कायदा सुव्यवस्थेबाबत गंभीर चर्चा सुरू झाली आहे.
17 तोळे सोन्याच्या दागिन्यांसह महिलेची पर्स चोरीला; एकाच कुटुंबातील तीन चोरांना अटक