कुटुंबातील सदस्यांचा एकमेकांवर फार जीव असतो. इतकी की कधी कधी ते त्यांच्या जाण्याने स्वतलागी संपवण्यात मागचा पुढचा विचार करत नाही. अशीच एक घटना लखनऊमध्ये उघडकीस आली आहे. एका कुटुंबातील लहान मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) मृत्यू झाल्याने दु:खी झालेल्या आधी वडिलांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. घरात भाऊ आणि वडिलांची कमतरता जाणवत असल्याने घरातील मोठ्या मुलानेही विष प्राशन करून आत्महत्त्या (Suicide) केली. या धक्क्यात आईला हृदयविकाराचा झटका आला. सध्या तिच्यावार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
[read_also content=”अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणी ट्विस्ट! सेबीचा सर्वोच्च न्यायालयात मोठा खुलासा, म्हणाले- ‘2016 पासून तपास नाही…’ https://www.navarashtra.com/india/sebi-said-to-supreme-court-that-allegations-of-adani-group-investigations-since-2016-factually-baseless-nrps-399942.html”]
लखनौच्या त्रिवेणी नगरमधील मौसम बाग कॉलनीतील हे प्रकरण आहे. सेवानिवृत्त अभियंता नागेंद्र प्रताप सिंग हे त्यांचा मुलगा सूरज प्रताप सिंग, सून रुबी आणि दोन नातू श्रीकांत आणि कृष्णकांत यांच्यासह येथे राहत होते. कृष्णकांत यांचे ३१ मार्च रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. दुसरीकडे, आपल्या मुलाच्या मृत्यूने हादरलेले वडील सूरज प्रताप सिंग यांनीही त्याच दिवशी आपल्या परवाना असलेल्या रिव्हॉल्व्हरने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. त्यानंतर सुमारे दीड महिन्यानंतर अखेर सोमवारी वृद्ध नागेंद्र यांच्या कुटुंबावर पुन्हा संकटांचा डोंगर कोसळला. आता त्यांचा मोठा नातू श्रीकांत याने विषारी द्रव्य प्राशन करून जीवन संपवले.
दीड महिन्यापूर्वी पती आणि लहान मुलगा गमावल्याने आई दु:खात बुडाली होती. त्यानंतर श्रीकांतच्या निधनाची बातमी कळली तेव्हा ती हा धक्का सहन करु शकली नाही आणि तिला हृदयविकाराचा झटका आला. ही बाब शेजाऱ्यांना कळताच त्यांनी तिला रुग्णालयात नेले. सध्या त्याच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.
मोठा मुलगा श्रीकांतची लॉकडाऊन दरम्यान नोकरी गेली होती. तेव्हापासून तो लखनऊच्या घरी राहत होता. दरम्यान, मार्चमध्ये वडील आणि भावाच्या मृत्यूने ते दु:खी झाला. आता सोमवारी उशिरापर्यंत झोपल्यानंतरही तो उठला नाही तेव्हा आईने त्याला उठवले. पण तो काहीच बोलला नाही. त्यानंतर शेजाऱ्यांना मदतीने श्रीकांतला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.